Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्ण, मृत्यूसंख्येत घट 1947 नवे रूग्ण, 1629 कोरोनामुक्त

दिवसभरामध्ये 46 कोरोना मृत्यू, सक्रीय रूग्णसंख्या चौदा हजारांवर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 46 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 947 नवे रूग्ण आढळून आले. तसेच 1 हजार 629 जण कोरोनामुक्त झाले. नवे रूग्ण, मृत्यू संख्येत घट झाली असली तरी सक्रीय रूग्णसंख्या 14 हजार 461 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 46 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 539 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 820, नगरपालिका क्षेत्रात 569, शहरात 717 तर अन्य 433 आहेत. मृतांमध्ये परजिल्ह्यांतील चौघे आहेत. दिवसभरात 1 हजार 629 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 87 हजार 241 झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 947 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 44, भुदरगड 8, चंदगड 27, गडहिंग्लज 80, गगनबावडा 9, हातकणंगले 250, कागल 33, करवीर 324, पन्हाळा 92, राधानगरी 14, शाहूवाडी 21, शिरोळ 138, नगरपालिका क्षेत्रात 209, कोल्हापुरात 642 तर अन्य 61 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 5 हजार 241 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 4 हजार 805 अहवाल आले. त्यापैकी 3 हजार 863 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 168 अहवाल आले. त्यातील 2 हजार 681 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 538 रिपोर्ट आले. त्यातील 949 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 9 हजार 511 जणांचे स्वॅब रिपोर्ट आले.

जिल्ह्यात `म्युकर’चे 8 नवे रूग्ण


जिल्ह्यात सीपीआर हॉस्पिटलमध्ये गुरूवारी म्युकर मायकोसीसचे 8 नवे रूग्ण दाखल झाले. सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये 37 आणि महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये 28 रूग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय करवीर 2, कागल, हातकणंगले, शिरोळमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आहे. जिल्ह्यात म्युकरचे एकुण 70 रूग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

कोरोना रूग्ण 1947 ः एकूण ः 105241
कोरोनामुक्त 1629 ः एकूण ः 87241
कोरोना मृत्यू 46 ः एकूण मृत्यू ः 3539
सक्रीय रूग्ण ः 14461

Related Stories

…आणि शिरोळमध्ये उडाली एकच खळबळ

Archana Banage

देशातील सर्वोच्च सहवीज निर्मिती प्रकल्प वारणा कारखान्याच्या मालकीचा

Archana Banage

`टीपी’ भरणार महापालिकेची तिजोरी

Archana Banage

Kolhapur; साडीने गळा आवळून खून; अंगावरिल दागिने घेऊन चोरट्यांचं पलायन

Abhijeet Khandekar

जि.प. सदस्य राहुल आवाडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटिव्ह

Archana Banage

गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी ६ नोव्हेंबरला मतदान

Archana Banage