Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुक्तांमध्ये वाढ, मृत्यूत घट

Advertisements

जिल्ह्यात 23 कोरोना मृत्यू , नवे रूग्ण 1530, कोरोनामुक्त 1924 कोरोनामुक्तांची संख्या 1 लाखांवर, शहरात एकाही मृत्यूची नोंद नाही सक्रीय रूग्णसंख्येत घट

कोरोना रूग्ण 1530 : एकूण : 1,22,372
कोरोनामुक्त 1924 : एकूण : 1,04,246
कोरोना मृत्यू 23 : एकूण मृत्यू : 3910
सक्रीय रूग्ण : 14216

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात रविवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 23 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 530 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 924 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 14 हजार 216 झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्येत घट झाली असून कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाखावर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात शहरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. परजिल्ह्यातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 23 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 910 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 35, नगरपालिका क्षेत्रात 610, शहरात 788 तर अन्य 477 आहेत. मृतांमध्ये जिल्ह्यांतील 20 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 924 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 4 हजार 246 झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 530 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 47, भुदरगड 34, चंदगड 59, गडहिंग्लज 59, गगनबावडा 8, हातकणंगले 213, कागल 43, करवीर 283, पन्हाळा 101, राधानगरी 28, शाहूवाडी 12, शिरोळ 105, नगरपालिका क्षेत्रात 154, कोल्हापुरात 336 तर अन्य 48 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 22 हजार 372 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 2 हजार 890 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 788 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 4 हजार 134 अहवाल आले. त्यातील 3 हजार 643 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 712 रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 243 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 8 हजार 636 स्वॅब रिपोर्ट आले. दरम्यान, रविवारी कोरोनाने मृत्यू झालेल्यांत परजिल्ह्यांतील निपाणी, मुंबई आणि चिक्कोडी येथील व्यक्तींचा समावेश आहे.

             कोल्हापूर शहर    ग्रामीण, अन्य      एकूण

आजचे बाधीत रूग्ण 336 1194 1530
आजपर्यतचे बाधीत 34872 87500 1,22,372
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1924 1,04,246
दिवसभरातील मृत्यू 0 23 23
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 788 3122 3910

दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 561 2288 2890
अँटीजेन 491 3643 4134
ट्रुनेट 478 1243 1712

Related Stories

डॉ. कादंबरी बलकवडे यांना प्रशासकपदी मुदतवाढ

Archana Banage

बाळंतपणातील उपचारा अभावी जवानाच्या पत्नीचा मृत्यू : बच्चे सावर्डे येथील घटना

Archana Banage

टाेपमधील त्या रुग्णाच्या संपर्कातील डाॅक्टर पाॅझिटिव्ह

Archana Banage

लक्ष्मीपुरीतील सायकल दुकानाला आग

Archana Banage

कोल्हापूर : कुंभोज येथील वारणा नदी परिसरात पुन्हा केबल चोरीला सुरुवात

Archana Banage

सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सेवा संस्थांना टाळेच

Archana Banage
error: Content is protected !!