Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 32 जणांचा मृत्यू

1522 नवे रूग्ण, 1490 कोरोनामुक्त, शहरात दिवसभरात 9 जणांचा मृत्यू, जिल्ह्यातील सक्रीय रूग्णांमध्ये घट

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात रविवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 32 जणांचा मृत्Îू झाला. दोन दिवस कोरोना मृत्यूत घट झाली होती, रविवारी त्यात वाढ झाली आहे. दिवसभरात 1 हजार 522 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 490 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 331 झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्येत घट झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 61 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 724, नगरपालिका क्षेत्रात 725, शहरात 1 हजार 65 तर अन्य 547 आहेत. दिवसभरात 1 हजार 490 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 57 हजार 794 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 522 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 66, भुदरगड 36, चंदगड 24, गडहिंग्लज 93, गगनबावडा 3, हातकणंगले 193, कागल 112, करवीर 260, पन्हाळा 81, राधानगरी 42, शाहूवाडी 43, शिरोळ 126, नगरपालिका क्षेत्रात 135, कोल्हापुरात 288 तर अन्य 20 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 76 हजार 186 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 13 हजार 664 अहवाल आले. त्यापैकी 11 हजार 137 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 147 अहवाल आले. त्यातील 3 हजार 19 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 4 हजार 308 अहवाल आले. त्यातील 2 हजार 925 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 6 हजार 209 रिपोर्ट आले. त्यातील 5 हजार 193 निगेटिव्ह आहेत.

शहरातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू

परजिल्ह्यातील सांगली येथील दोघांचा तर शहरातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूंमध्ये शिवाजी पेठ, रंकाळा रोड, राजोपाध्येनगर, सीबीएस स्टँड, विचारे माळ, आझाद गल्ली, गंगानगर आणि साईक्स एक्स्टेंशन येथील दोघांचा समावेश आहे.

कोरोना रूग्ण : 1522 एकूण : 1,76,186
कोरोनामुक्त : 1490 एकूण : 1,57,794
कोरोना मृत्यू 32 : एकूण मृत्यू : 5061
सक्रीय रूग्ण : 13331

Related Stories

आयपीएल मॅच बेटिंग प्रकरणी एकास अटक

Archana Banage

Kolhapur; ओव्हरटेक करताना ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ठार

Abhijeet Khandekar

बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींचीच बाजी; आपल्या जिल्ह्याचा निकाल पहा एका क्लिकवर

Archana Banage

उत्रे गावात तीन दिवस कडकडीत बंद

Archana Banage

शिरोळ तालुक्यात कोणतेही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही – सकल मराठा समाज

Archana Banage

लॉकडाऊन काळासह नियमित वापरातील वीज बीलातील स्थिर आकार रद्द करा

Archana Banage