Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यूंत वाढ, आज 28 मृत्यू, 1327 नवे रूग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हय़ात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 28 जणांचा मृत्य़ू झाला. दिवसभरात 1 हजार 327 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 347 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 762 झाली आहे. कोरोना मृत्यूंमध्ये वाढ झाली असून नव्या रूग्णांत, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे.

जिल्हय़ात गुरूवारी कोरोनाने 28 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 158 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 779, नगरपालिका क्षेत्रात 728, शहरात 1 हजार 99 तर अन्य 552 आहेत. दिवसभरात 1 हजार 347 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 64 हजार 323 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 327 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 51, भुदरगड 51, चंदगड 14, गडहिंग्लज 37, गगनबावडा 1, हातकणंगले 134, कागल 89, करवीर 270, पन्हाळा 61, राधानगरी 48, शाहूवाडी 34, शिरोळ 121, नगरपालिका क्षेत्रात 101, कोल्हापुरात 291 तर अन्य 24 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 82 हजार 243 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 13 हजार 704 अहवाल आले. त्यापैकी 12 हजार 361 निगेटिव्हआहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 445 अहवाल आले. त्यातील 3 हजार 246 निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 3 हजार 118 अहवाल आले. त्यातील 2 हजार 856 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 7 हजार 141 रिपोर्ट आले. त्यातील 6 हजार 259 निगेटिव्ह आहेत.

शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्य़ू

बेळगाव जिल्हय़ातील एकाचा तर कोल्हापूर शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूंमध्ये राधानगरी रोड, महावीर रोड, रामानंदनगर, शिवाजी पेठ, रमणमळा, राजोपाध्येनगर, बिंदू चौक, लाईन बाजार, आपटेनगर, कळंबा रोड आणि शहरातील एकाचा समावेश आहे.
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 291 1036 1327
आजपर्यतचे बाधीत 49245 1,32,998 1,82,243
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1347 1,64,323
दिवसभरातील मृत्यू 11 17 28
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 1099 4059 5158
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 183 3246 3445
अँटीजेन 262 2856 3118
ट्रुनेट 882 6259 7141
…………………
सक्रीय रूग्ण 12,762
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 90.00 टक्के
एकूण चाचण्या : गुरूवार : 13704 एकूण 13,54,630
मृतांची संख्या : 28 जिल्हा : 27 बाहेरील : 1
दीर्घकालीन व्याधी 0 0
60 वर्षावरील 0 0
पहिल्या 48 तासांत मृत्यू 0 0
आजअखेर मृत संख्या 5158 जिल्हा : 4607 अन्य : 551

Related Stories

इचलकरंजी येथील मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक

Archana Banage

डॉल्बी वाजलीच पाहिजे! उदयनराजे आक्रमक

Abhijeet Khandekar

नोंदणी तारखेपासून शिष्यवृत्ती द्या; सारथीच्या लाभार्थी संशोधक विद्यार्थ्यांची मागणी

Abhijeet Khandekar

भाड्याने राहणाऱ्या नागरिकांना शासनाचा दिलासा

Archana Banage

कोल्हापूर : कृष्णा आणि पंचगंगा पाणी पातळीत गेल्या बारा तासात एक फुटाने वाढ

Archana Banage

Kolhapur : दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे सोमवारी प्रात्यक्षिक

Abhijeet Khandekar