Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृत्यू, सक्रीय रूग्णांमध्ये घट

2 मृत्यू, 114 नवे रूग्ण,139 कोरोनामुक्त,चंदगड, गगनबावडामध्ये नवी रूग्ण नोंद शुन्य, शहरातील एकाचा मृत्यू , परजिल्ह्यात निरंक

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 1 व जिल्ह्यातील एक आहे. दिवसभरात 114 नवे रूग्ण आढळले तर 139 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 477 झाली आहे. महिनाभरात दुसऱयांदा सक्रीय रूग्णसंख्या दीड हजारांखाली आली आहे. मृत्यू, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. गगनबावडा, चंदगड, तालुक्यात नव्या रूग्णांची नोंद शुन्य आहे. परजिल्ह्यातील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने शहरातील शाहूपुरीतील व हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील एकाचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 700 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 48, नगरपालिका क्षेत्रात 819, शहरात 1 हजार 240 तर अन्य 593 आहेत. दिवसभरात 139 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 96 हजार 822 झाली आहे. गेल्या 24 तासांत 139 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 4, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 13, कागल 3, करवीर 19, पन्हाळा 5, राधानगरी 1, शाहूवाडी 2, शिरोळ 9, नगरपालिका क्षेत्रात 10, कोल्हापुरात 41 तर परजिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 3 हजार 999 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 11 आणि ग्रामीण भागात 402 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

कोरोना रूग्ण : 114 एकूण :2,03,999
कोरोनामुक्त :139 एकूण :1,96,822
कोरोना मृत्यू :2 एकूण मृत्यू :5700
सक्रीय रूग्ण :1477

Related Stories

Kolhapur : शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन; दुर्मीळ शस्त्रास्त्रे पाहणी संधी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : डीकेटीई मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात निवड

Archana Banage

महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक ;चंद्रकांत पाटील यांची माहिती

Archana Banage

2 कोटी 12 लाखांची अर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

कोल्हापुरात शाहू टोलनाक्याजवळ ऑक्सिजन टँकर लिक

Rahul Gadkar

पानसरे हत्या प्रकरण : संशयित आरोपीच्या जामीन अर्जावर २४ ऑगस्टला सुनावणी

Archana Banage