Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 6 मृत्यू, सक्रीय रूग्णांमध्ये घट

Advertisements

6 मृत्यू, 40 नवे रूग्ण, 76 कोरोनामुक्त, परजिल्ह्यातील मृत्यूची नोंद निरंक

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात सोमवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यक्तोचा समावेश आहे. शहर, परजिल्ह्यातील मृत्Îूची नोंद निरंक राहिली. दिवसभरात 40 नवे रूग्ण आढळले तर 76 जण कोरोनामुक्त झाले. पाच महिन्यानंतर प्रथमच नवी रूण्णसंख्या पन्नासच्या खाली आली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 622 आहे.

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील पट्टणकोडोली, उचगाव, मुरगुड, हुपरी, पट्टणकोडोली आणि राधानगरी येथील व्यक्तींचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 757 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 81, नगरपालिका क्षेत्रात 826, शहरात 1 हजार 249 तर अन्य 601 आहेत. दिवसभरात 76 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 99 हजार 382 झाली आहे. गेल्या 24 तासांत 40 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 1, गगनबावडा 1, हातकणंगले 4, कागल 2, करवीर 5, पन्हाळा 0, राधानगरी 1, शाहूवाडी 1, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 4, कोल्हापुरात 19 तर परजिल्ह्Îातील तिघांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 5 हजार 761 झाली आहे. जिल्ह्यात आजरा, भुदरगड, पन्हाळा येथे नवी रूग्ण संख्या नोंद शुन्य राहिली. सद्यस्थितीत शहरात 10 आणि ग्रामीण भागात 239 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

कोरोना रूग्ण : 40 एकूण : 2,05,761
कोरोनामुक्त : 76 एकूण : 1,99,382
कोरोना मृत्यू : 6 एकूण मृत्यू : 5757
सक्रीय रूग्ण : 622

Related Stories

जाखलेत पत्नीकडून पतीचा हातोड्याने खून

Archana Banage

रूग्णवाहिका लावायची असेल तर पावती फाडा

Archana Banage

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले ध्वजारोहण

Archana Banage

”…तर तीन महिन्यात सतेज पाटलांची आमदारकी रद्द करणार”

Abhijeet Khandekar

किटवाड-ढोलगरवाडी रस्त्याचे काम दर्जाहीन

Archana Banage

राधानगरी धरण स्थळावरील सर्वात जुने राजाराम महाराज कालीन जलविद्युत केंद्र सुरू करा

Archana Banage
error: Content is protected !!