Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू, 470 नवे रुग्ण

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाने 27 जणांचा मृत्यू झाला. एका संशयिताचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना मृत्यूची संख्या 590 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात 470 नवे रुग्ण दिसून आले तर 360 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 11207 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19 हजार 551 झाली असून हा टप्पा वीस हजारांपर्यंत पोहोचला आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 27 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील 52 वर्षीय पुरुष. राजारामपुरीतील 75 वर्षीय वृद्ध, लक्षतीर्थ वसाहत 79 वर्षीय वृद्ध, करवीर तालुक्यातील चुये येथील 20 वर्षीय तरुणी, शुक्रवार पेठेतील 67 वर्षीय पुरुष, हातकणंगले येथील 67 वर्षीय पुरुष, पन्हाळा तालुक्यातील मोहरे येथील 70 वर्षीय महिला, इचलकंरजी येथील 75 वर्षीय महिला, कागल येथील 80 वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील गिरगाव येथील 66 वर्षे महिलेचा मृत्यू सीपीआर मध्ये झाला.

इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील केटकाळे नगर 70 वर्षीय महिला, शहापूर येथील 62 वर्षीय महिला, टेंब मळा येथील 82 वर्षीय पुरुष, रेदाळ येथील 68 महिलेचा मृत्यू झाला. कदम वाडी येथील हॉस्पिटलमध्ये पन्हाळा तालुक्यातील सावर्डे येथील 92 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला. उद्यम नगर येथील हॉस्पिटलमध्ये कागल तालुक्यातील निठोरी येथील 65 वर्ष पुरुष, करवीर तालुक्यातील चिखली येथील 57 वर्षे महिला, शहरातील मंगळवार पेठेतील ५९ वर्षे पुरुषाचा मृत्यू झाला . शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये रविवार पेठेतील 79 वर्षे पुरुष रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तळेवाडी येथील 62 वर्षे पुरुष हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील पस्तीस वर्षे पुरुष आणि बळवंत नगर येथील 74 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

नागाळा पार्क येथील हॉस्पिटलमध्ये भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी येथील 72 वर्षीय वृद्ध तसेच शिवाजी पेठेतील 32 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. राजारामपुरीतील हॉस्पिटलमध्ये जयसिंगपूर शाहुनगर तील 55 वर्षे पुरुष आणि रंकाळा येथील हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील 78 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. आज पर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 215, नगरपालिका क्षेत्रात 196 कोल्हापूर शहरात 155 आणि अन्य 24 अशा 590 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत आजरा 6, भुदरगड 12, चंदगड 2 गडिंहग्लज 9, हातकणंगले 103 , कागल 33 , करवीर 62 , पन्हाळा 7, राधानगरी 11, शाहुवाडी 4 , शिरोेळ 62 , नगरपालिका क्षेत्र 40, कोल्हापूर कोल्हापूर शहर 110 अन्य 9 असे 470 नवे रुग्ण आढळले आहेत.

आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्हांची संख्या 19 हजार 551 झाली आहे. तर 360 जणांना घरी सोडण्यात आले आहे त्यामुळे कोरोना मुक्ताची संख्या 11207 झाली आहे.

कोरोना मुक्त रुग्ण – 11 हजार 207,
सध्या उपचार घेणारे रुग्ण – 7755
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण – 19551

Related Stories

शहरवासियांना फुकट पाणी देता का?

Archana Banage

कोल्हापुरात आठवडाभरात 200 जणांना चाचणी लस

Archana Banage

कोल्हापूर :लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विक्रीवरील बंदी उठवा अन्यथा..

Archana Banage

कोरोना रोखण्यासाठी नरंदे ग्रामपंचायततिची जनचळवळ

Archana Banage

कोल्हापूर : मासा बेलेवाडीतील गणेश विसर्जनाची अनेक वर्षांची परंपरा खंडीत

Archana Banage

अज्ञात जनावराकडून तीन शेळ्या, एका वासराचा फडशा

Archana Banage
error: Content is protected !!