Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत 312 पॉझिटिव्ह रुग्ण

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भरच पडत आहे. यामुळे कोल्हापूर वासियांच्या चिंतेत वाढ होत आहे. तर प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणा संतर्क झाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजता आणखी 63 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आज सकाळपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 312 झाली आहे.

आज जिल्ह्यात दुपारपर्यंतच कोरोना रुग्णांच्या संख्येने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. यात कोल्हापूर शहर 51, करवीर तालुका 27, हातकणंगले 56, शिरोळ 18, पन्हाळा 24, राधानगरी 19, कागल 27, भुदरगड 14, गडहिग्लज तालुक्यात 2 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

‘आप’ सरकारची मोठी घोषणा; काश्मिरी पंडितांच्या दुकानांना मिळणार मोफत वीज कनेक्शन

Archana Banage

रायगड-हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट; बोटीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

Archana Banage

सोलापुरात आज 28 कोरोनाग्रस्तांची भर, 6 जणांचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : किसान सभेचा 26 मार्चला भारत बंद

Archana Banage

वर्षभरापासून कुटुंबीयांना नाहक त्रास; केंद्रीय महिला आयोगाकडे जाणार

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!