Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात दोन, शहरात आठ नवे कोरोना रुग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे दहा रुग्ण आढळले. यामध्ये शहरात आठ तर संपूर्ण जिल्ह्यात दोन रुग्ण मिळून आले. दिवसभरात दहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रीय रुग्ण संख्या 110 इतकी आहे. आरोग्य विभागाकडून शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आजरा, भुदरगड, चंदगड, गगनबावडा, हातकणंगले, कागल, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

तर गडहिंग्लज तालुका आणि जयसिंगपूर नगरपालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. आरटीपीसीआर चाचणीच्या 186 अहवालामधून तीन, खासगी हॉस्पिटल, लॅबच्या 1665 अहवालामधून सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला.

Related Stories

केर्ली येथे अपघातात निवृत्त पोलीस निरीक्षक ठार

Archana Banage

राजू शेट्टींच्या जलसमाधी यात्रेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Archana Banage

राज्य सरकारने जिल्हा बँकांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवली

Archana Banage

कोल्हापूर : गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय पूर्ण वेळ विलगीकरण रूग्‍णालय – जिल्हाधिकारी

Archana Banage

भगवे फेटे, लेझीम, कुस्ती अन् कोल्हापुरी बाणा

Archana Banage

कर्नाटक : पावसामुळे निर्यातीक्षम कॉफीचे अतोनात नुकसान

Abhijeet Khandekar