Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात बळींची संख्या हजाराच्या उंबरठय़ावर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात गुरूवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 27 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 985 वर पोहोचली. कोरोना बळींचा आकडा 1 हजार बळींच्या उंबरठय़ावर आहे. गुरूवारी 728 रूग्ण कोरोनामुक्त झाले तर 902 नवे कोरोना रूग्ण समोर आले. कोरोनामुक्तांची संख्या 20 हजार 739 झाली आहे तर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 32 हजार 320 झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

जिल्हय़ात गुरूवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 1 हजार 551 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1 हजार 705 जणांचे स्वॅब घेण्यात आले, 600 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. सध्या 10 हजार 496 कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 2 हजार 223 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 2 हजार 201 निगेटिव्ह असून 380 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 600 रिपोर्ट आले. त्यापैकी 442 निगेटिव्ह असून 366 पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्हय़ात गुरूवारी कोरोनाने 27 जणांचा मृत्य़ू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये मंगळवार पेठेतील 71 वर्षीय पुरूष, आर. के. नगर येथील 77 वर्षीय पुरूष, माले, पन्हाळा येथील 45 वर्षीय पुरूष, पाचगाव करवीर येथील 57 वर्षीय महिला, उमळवाड शिरोळ येथील 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये वसगडे करवीर येथील 53 वर्षीय पुरूष, निमशिरगाव शिरोळ येथील 80 वर्षीय पुरूष, माणगाव रूकडी येथील 85 वर्षीय पुरूष, गोखले मळा इचलकरंजी येथील 63 वर्षीय महिला, अब्दुललाट शिरोळ येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

शहर, जिल्हय़ातील केअर सेंटर, खासगी हॉस्पिटल्समध्ये नागाळा पार्क येथील 65 वर्षीय पुरूष, चिपरी शिरोळ येथील 65 वर्षीय पुरूष, पुलाची शिरोली हातकणगंले येथील 66 वर्षीय पुरूष, सिद्धनेर्ली कागल येथील 70 वर्षीय महिला, प्रतिभानगर येथील 53 वर्षीय पुरूष, शनिवार पेठेतील 60 वर्षीय पुरूष, नागदेववाडी करवीर येथील 65 वर्षीय पुरूष, शाहूपुरी स्टेशन रोड येथील 72 वर्षीय पुरूष, जयसिंगपूर शिरोळ येथील 65 वर्षीय पुरूष, उदगाव शिरोळ येथील 44 वर्षैय पुरूष, इचलकरंजी येथील 66 वर्षीय पुरूष, यळगुड, हातकणंगले येथील 65 वर्षीय 65 वर्षीय पुरूष, इचलकरंजी येथील 65 वर्षीय पुरूष, जयसिंगपूर शिरोळ येथील 56 वर्षीय पुरूष, 52 वर्षीय पुरूष, कोगनोळी, सांगली येथील 72 वर्षीय पुरूष, अथणी कर्नाटक येथील 77 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने 985 जणांचा बळी घेतल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी सांगितले.

शहरातील पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10 हजारांवर
शहरात गेल्या 24 तासांत 288 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 10 हजार 274 झाली आहे. दिवसभरात कोरोनाने आठ जणांचा मृत्यू झाल्याने 258 जणांचा बळी गेला आहे. कोरोना बळींमध्ये ग्रामीण भागात 419, नगरपालिका क्षेत्रात 263, महापालिका क्षेत्रात 258 तर अन्य 45 अशा 985 जणांचा समावेश आहे. जिल्हय़ात गेल्या 24 तासांत आजरा 20, भुदरगड 7, चंदगड 9, गडहिंग्लज 36, गगनबावडा 5, हातकणंगले 121, कागल 30, करवीर 91, पन्हाळा 34, राधानगरी 13, शाहूवाडी 23, शिरोळ 67, नगरपालिका क्षेत्रात 117, कोल्हापूर शहर 288 आणि अन्य 41 असे 902 रूग्ण दिसून आले.

Related Stories

अंबाबाई मंदिराला ३०० पोलिसांचे संरक्षण

Archana Banage

मिरज-कोल्हापूर रस्ता दररोज अर्धा तास राहणार बंद

Archana Banage

जोतिबा मंदीरात भाविकाचे पैसे चोरणारी महिला पोलीसांच्या ताब्यात

Archana Banage

कोल्हापूर : पावसाअभावी पेरणी पिके करपली

Archana Banage

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्त्या

Archana Banage

मार्च महिन्यातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्यास मुदतवाढ – खासदार संजय मंडलिक

Archana Banage