Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात ‘म्युकर मायकोसिस’चा धोका वाढला

Advertisements

खासगी हॉस्पिटलमध्ये काही रूग्णांवर उपचार, घसा आणि नाकातील स्वॅबद्वारे`म्युकर’चे निदान

कोल्हापूर / कृष्णात पुरेकर

गुजरातनंतर महाराष्ट्रातही म्युकर मायकोसीस’चे रुग्ण वाढत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसीसची लक्षणे असलेले काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त कोमॉर्बीड रुग्णांतम्युकर मायकोसीस’चा प्रादुर्भाव वाढला आहे. बुरशीजन्य साथ असल्याने त्यावर नियंत्रण शक्य आहे.

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्तांना आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग लवकर होतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेत संसर्गाचा कालावधी कमी आहे. संसर्गाची लक्षणे सारखी असली तरी रूग्णाला ऑक्सिजनची गरज लवकर भासत आहे. कोमॉर्बीड रूग्णांत संसर्गाचा धोका आणखी वाढतो आहे. कोमॉर्बीड रूग्ण 14 दिवस उपचारानंतर कोरोनामुक्त होत आहेत, पण अशा अधिकतर रुग्णांत म्युकर मायकोसीस अर्थात फंगस इन्फेक्शनची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्युकर मायकोसीस’ रुग्णांची संख्या कमी होती, पण दुसऱया लाटेत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनावरील उपचारादरम्यान, फंगस इन्फेक्शन होते. त्यालाम्युकर मायकोसीस’ म्हणतात. गुजरातनंतर महाराष्ट्रात म्युकर मायकोसीस रूग्ण दिसून येत आहेत. गुजरातमध्ये अशा 80 रूग्णांपैकी 9 जणांचा म्युकर मायकोसीसने बळी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत म्युकर मायकोसीसचे रूग्ण दिसून आले आहेत, त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनावरील उपचारादरम्यान रुग्णांना स्टेरॉईड ड्रग दिली जातात. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता खालावते. त्याचे साईड इफेक्टही `म्युकर’वाढीसाठी कारणीभूत ठरतात. नाकावाटे डोळ्याच्या नसाजवळ बुरशी जमा होते. त्यातून सेंट्रल रेटीनरी आर्टरीला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो अन् दृष्टी जाण्याचा धोका वाढतो आहे. म्युकर मायकोसीसही लक्षणे मधुमेही रूग्णांत अधिक प्रमाणात दिसून येत असल्याची माहिती नेत्रतज्ञ डॉ. अभिजित ढवळे यांनी दिली.

म्युकर मायकोसीसची लक्षणे

`म्युकर’च्या लक्षणांत प्रामुख्याने नाक कोरडे पडणे, नाकाच्या आतील आवरण कोरडे पडणे, चेहरा, तळपायाची त्वचा सुन्न होणे, दात हिरडÎांतून सैल होणे, चेहऱयावर सुज, डोकेदुखी, डोळेदुखे आदी लक्षणे दिसतात. यावर तातडीने उपचार केल्यास म्युकर इंन्फेक्शन नियंत्रण आणता येणे शक्य आहे. म्युकर मायकोसीसचे निदान सिटीस्कॅन आणि नाक (सायनस) व घशातील स्वॅबद्वारे केले जाते.

वेळीच उपचार केल्यास म्युकर मायकोसिस नियंत्रणात : डॉ. लोकरे

यापूर्वी सीपीआ’मध्ये म्युकर मायकोसीसचे रूग्ण शस्त्रक्रिया, औषधोपचाराद्वारे बरे झाले आहेत. स्टेरॉईडच्या वापरामुळे मधुमेहींच्या रक्तातील साखर वाढते. कोरोनावरील उपचारादरम्यान रूग्ण बेडवर राहिल्याने म्युकरचा संसर्ग होतो. त्यामुळे अशा रूग्णांची संख्या वाढत आहे. या रूग्णांना वेळीच औषधोपचार मिळाल्यास म्युकरपासून वाचवणे शक्य होणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.

`म्युकर मायकोसिस’वर आता जीवनदायीतून उपचार

राज्यात कोरोनानंतर अनेक रूग्णांत म्युकर मायकोसीस या बुरशीजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून म्युकर मायकोसीस असलेल्या रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Related Stories

अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; GDP 8 टक्के राहण्याचा अंदाज

datta jadhav

अल्पवयीन दोन मुलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Patil_p

‘५ दिवसात ७५ किलोमीटर’ रस्ता बांधण्याचा विक्रम..!

Nilkanth Sonar

अंबरनाथ : एमआयडीसीमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग

Tousif Mujawar

म्हैसाळ हत्याकांड: मांत्रिकाला अटक

Abhijeet Khandekar

बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

Archana Banage
error: Content is protected !!