Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्णसंख्या 50 च्या आत

कोल्हापूर जिल्ह्यात महिलेसह दोघांचा मृत्यू जिल्हÎात 8 नवे रूग्ण, 22 कोरोनामुक्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हÎात गुरूवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये कसबा बावडा येथील 75 वर्षीय वृद्धाचा आणि खासगी हॉस्पिटलमध्यें सिंधुदुर्ग जिल्हÎातील सांगिर्डेवाडी (ता. कुडाळ) येथील 62 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1,705 झाली आहे. गेल्या 24 तासांत 8 नवे रूग्ण दिसून आले. तर 22 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 279 जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 50 असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्हÎात गुरूवारी कोरोनाने शहरातील कसबा बावडा येथील वृद्धाचा, सिंधुदुर्ग जिल्हÎातील महिलेचा मृत्यू झाला. आजपर्यत केरोनाने 1 हजार 705 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 840, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 365 तर अन्य 153 जणांचा समावेश आहे. सध्या 50 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 279 जणांची तपासणी केली. त्यातील 103 जणांची ऍटीजेन टेस्ट केली.

शेंडा पार्क येथील लॅबमधून गुरूवारी 715 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 689 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 103 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 102 रिपोर्ट आले, त्यापैकी 96 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 1, करवीर 1, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 4 व अन्य 1 असे 8 रूग्ण आहेत. दिवसभरात 22 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 772 झाले. नव्या 8 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 527 झाल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.

पॉझिटिव्ह रूग्ण 8, कोरोनामुक्त 22, कोरोना मृत्यू 2
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 527
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 772
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 50
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1705
गेल्या 24 तासांत 279 संशयितांची तपासणी

Related Stories

काँग्रेसमधील वातावरण असंतुष्ट, राजीनामा देण्याचीही अनेकांची तयारी

datta jadhav

इचलकरंजीतील कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रावर नागरिकांच्यात गोंधळ

Archana Banage

पाचगाव परिसरात डेंग्यूचा कहर ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage

सीमाप्रश्नावरील सुनावणी लांबणीवर

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कसबा सांगाव ग्रामपंचायत उपसरपंचासह सात सदस्यांनी दिले राजीनामे

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील १०० केंद्रांवर कोरोना लसीचा तुटवडा

Archana Banage