Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात ७८३ नवे रुग्ण, १७ जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिह्यात मागील 24 तासात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, 783 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 506 इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत 13 हजार 660 इतके रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 8 हजार 175 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 671 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये करवीर तालुक्यातील कणेरवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, सांगवडे येथील पंचवीस वर्षे पुरुष, उचगाव येथील महिला, शनिवार पेठेतील 68 वर्षे पुरुष, आरती नगरीतील 67 वर्षीय महिला, कागल तालुक्यातील 64 वर्षीय पुरुष व 76 वर्षी महिला, कसबा सांगाव, जयसिंगपूर येथील 70 वषीय महिला, 86 वर्षीय पुरुष, पन्हाळा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आदींचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये जयसिंगपूर येथील 70 वर्षे पुरुष कबनूर येथील 56 वर्षे पुरुष शहापूर येथील 66 वर्षे पुरुष यांचा मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात आजरा तालुक्यातील पंचवीस वर्षे युवक, पट्टणकडोली येथील 68 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष आणि राजारामपुरी दहाव्या गल्लीतील साठ वर्षे पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

वयोमानानुसार जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या
वय वर्ष            रुग्णसंख्या

1 वर्षाच्या आतील 21
1-10 वर्ष.              1063|
11-20 वर्ष.            1833
21-50 वर्ष.           12,288
51-70 वर्ष             5969
71 वर्षावरील.          1332
एकूण.                    22,506

मागील 24 तासात तालुकानिहाय आढळलेले रुग्ण
तालुका               रुग्णसंख्या
आजरा                     9
भुदरगड                   28
 चंदगड                    13
गडहिंग्लज                 13
गगनबावडा                01
हातकणंगले                98
कागल.                        35
करवीर.                       69
पन्हाळा.                       27
राधानगरी.                    15
शाहूवाडी.                     02
शिरोळ.                        41
जिह्यातील नगरपालिका 63
महानगरपालिका.            343
बाहेरून जिह्यात आलेले 26
एकूण.                         783

Related Stories

हातकणंगले बस स्थानकात परप्रांतीय कामगारांनी मांडला ठिय्या

Archana Banage

शिरोळमधुन एक विवाहिता वय १९ वर्षाच्या तरुणी बेपत्ता

Archana Banage

कोल्हापूर : म्युकरने दोघांचा मृत्यू, 3 नवे रूग्ण

Archana Banage

फिंगर प्रिंट एक्स्पर्ट परिक्षेत प्रियांका संकपाळ देशात पहिल्या

Archana Banage

डॉ. उषादेवी ठरल्या कोरोना नियंत्रणात समन्वयी दुर्गा !

Archana Banage

उजळाईवाडी विमानतळ परिसरात विमान इंधनाची सोय

Kalyani Amanagi