Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून नवमतदार नोंदणी

प्रतिनिधी / कोल्हापूर

भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबरपासून नवमतदार नोंदणी सुरु होणार आहे. यामध्ये मतदार नेंदणी करणार्यांनाच आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तरी मतदारांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी मंगळवारी केले. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणा-यांना सर्व पात्र नागरीकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील नाव वगळणी करणे तपशील करणे व एकाच मतदार संघात स्थानांतर करणे ही संधी देखील उपलब्ध होणार आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक असे, 9 ऑगस्ट 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधित दुबार/ समान नेंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणा करणे, योग्यप्रकारे विभाग/ भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण पेले जाणार आहे. 1 नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी होऊन मतदार नोंदणीला सुरुवात होणार आहे. यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारल्या जातील, विशेष मोहिमांसाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून दिवस निश्चित केला जाईल, 20 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील, यानंतर 5 जानेवारी 2022 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

प्रारुप मतदार यादी येथे होणार प्रसिध्द

प्रारूप मतदार यादी 1 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार, अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अवलोकनार्थ उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर ही मतदार यादी आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल.

मतदारांनी आवश्यकतेप्रमाणे भरावयाचे अर्ज

1) नमुना क्रमांक 6 (मतदार यादीत नांव सामाविष्ट करावयासाठी अर्ज)
2) नमुना क्रमांक 7 (मतदार यादीतील नांवाची वराळणी करावयासाठी अर्ज)
3) नमुना क्रमांक 08 (मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज)
4) नमुना क्रमांक 08-अ (एकाच मतदारसंघात मतदार यादीचे नांदीचे स्थानांतर करण्यासाठी अर्ज)

मतदार नोंदणीचे अर्ज येथे द्यावेत

मतदारांनी नोंदणीसह इतर अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा संबंधित तालुकेतील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) व कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये रहिवास करत असलेल्या मतदारांनी एल. बी. टी. शाखा, शिवाजी मार्केट, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांचेकडे सादर करावेत. तसेच आयोगाने विकसित केलेल्या NVSP Voter Portal तसेच Voter Helpline APP द्वारे करणेत यावे. त्यांच्या लिंक पुढीलप्रमाणे अशा, मतदार सेवा पोर्टल (NVSP): http://www.nssp.in/, वोटर पोर्टल: https://voterportal.eci.gov.in/, वोटर हेल्पलाइन अप (Voter Helpline APP).

Related Stories

पाटलांच्या पोरांना लग्नाआधी पोरं असतात, राजन पाटील यांची जीभ घसरली

datta jadhav

कोल्हापूर महापालिका प्रशासक आणि कर्मचारी संघातील चर्चा फिस्कटली

Archana Banage

मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत

Archana Banage

दुधाला पंधरा दिवसांत दुसरी उकळी

Archana Banage

कोल्हापूर : महाराष्ट्र हॉलीबॉल असोसिएशनची अधिकृत वेबसाईट सुरू करणार : विजय डांगरे

Archana Banage

कुरुंदवाडात धार्मिक एकात्मतेची वीण घट्ट, मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना

Archana Banage