Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजार ऑक्सिजन बेडचे नियोजन : पालकमंत्री

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोरोनाची तिसरी लाट 15 ऑक्टोंबरपर्यंत येईल असा अंदाज आहे. दुसर्या लाटेत कोरोनाची उच्चतम रुग्णसंख्या 19 हजार 962 होती. ती आता दीडपट म्हणजे 29 हजारपर्यंत गृहीत धरली आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली आहे. जिह्यातील कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर येथे 10 हजार ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

पालमंत्री पाटील म्हणाले, तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले जाणार आहे. संभाव्य तिसर्या लाटेत लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी `डेडीकेटेड पिडॅट्रीक केअर युनिट’ केले जाणार आहे. त्या अंतर्गत `सीपीआर’ मध्ये 42 बेड, `आयजीएम’ (इचलकरंजी) मध्ये 32 बेड व गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालय येथे 42 बेड असे एकूण 120 उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी आयसीयू युनिट करण्यात येत आहे. यामध्ये गडहिंग्जल उपजिल्हा रुग्णालय येथे 40 बेड व `आयजीएम’ येथील 50 बेडचा समावेश आहे. त्याचबरोबर कोविडसाठी गडहिंग्लजमध्ये  100 बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या सर्वांसाठी शासनाने मान्यता दिली आहे. तसेच व्याधीग्रस्त लहान मुलांच्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Related Stories

आम्हाला काय होतयं? या भ्रमात राहू नका!

Archana Banage

शिराळा नगरपंचायतीचा नव वर्षाचा ‘शिराळा शहर, हरीत शहर’ चा संकल्प

Archana Banage

पंचगंगाकाठी स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण सोहळा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : पावसाची उसंत,नद्यांच्या पाणीपातळीत घट

Archana Banage

केंद्राच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकच्या विविध योजनांची वारणेला मजूरी; केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंची घोषणा

Abhijeet Khandekar

सदावर्ते यांचा अडचणींचा वनवास संपता संपेना, आता ‘हे’ पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता

Archana Banage