Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात 26 शिक्षक पॉझिटिव्ह, संमतीपत्रास पालकांचा नकार

प्रशासनाची मात्र शाळा सुरु करण्याची तयारी पुर्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्य शासनाने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार (23 नोव्हेंबर) पासून सुरु करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा असे आदेश शुक्रवारी दिले आहेत. त्यानुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यास सुरुवात झाली. मात्र विद्यार्थ्यांची तपासणी आणि सुरक्षा यामुळे पालक संभ्रमावस्थेत आहे. बहुतांशी पालकांनी संम्मतीपत्रच दिले नसल्यामुळे सोमवारपासून शाळा सुरु होण्याचा मार्ग खडतर दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील 26 शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन हादरले आहे.

शाळा सुरु करताना पालक व शाळांसाठी मार्गदर्शक सुचना सक्तीच्या करण्यात आल्या. यामध्ये वर्गात पुरेसे अंतर राखले जावे अशी बैठक व्यवस्था, प्रवेशद्वारापासून विद्यार्थी वर्गात येईपर्यंत त्यांच्यात पुरेसे अंतर राखणे गरजेचे आहे. वर्गांचे सॅनिटायझेशन, थर्मल स्कॅन, मास्क सक्तीचा आहे. आठ महिन्यानंतर शाळा सुरु होण्यास दोनच दिवस बाकी असताना शाळा सुरु करण्याची तयारी युद्ध पातळीवर सुरु केली आहे. बहुतांशी शाळांनी स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचा पहिला टप्पा पुर्ण केला आहे. पालकाने संम्मतीपत्र दिल्यानंतरच पाल्याला शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र अद्याप पालकांनी संमतीपत्रच दिले नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापेक्षा पाल्याचे आरोग्य महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. 26 शिक्षक पॉझीटीव्ह आढळल्याने पालकवर्गामध्ये अधिकच भितीचे वातावरण पसरले आहे.

एकूण शिक्षक संख्या
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी : 12 हजार 550
तपासणी पुर्ण             ः 5 हजार
शिल्लक                 ः 5 हजार 50

त्या शिक्षकांना प्रवेश मिळणार काय
शुक्रवारअखेर पाच हजार शिक्षकांनी तपासणी केली आहे. उर्वरीत शिक्षकांना तपासणी करण्यास 24 ते 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांची तपासणी अद्याप झालेली नाही. त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार काय असा सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे.

राज्य शासनाने 10 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार शाळा सुरु करण्याची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. मात्र अद्याप पालकांकडून शाळा व्यवस्थापनास संमतीपत्र मिळालेले नाही. प्रत्येक विद्यार्थ्यास संमतीपत्र बंधनकारक असून त्यानंतर शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
किरण लोहार, शिक्षणअधिकारी (माध्यमिक )

तालुकानिहाय पॉझिटीव्ह शिक्षकांची आकडेवारी
आजरा   ः 0
भुदरगड  ः 6
चंदगड   ः 3
गडहिंग्लज ः 0
गगनबावडा ः 0
हातकणंगले ः 0
पन्हाळा   ः 0
शिरोळ    ः 4
राधानगरी  ः 7
कागल 4
करवीर 1
कोल्हापूर शहर ः 1
एकूण ः 26

Related Stories

पचगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ

Archana Banage

कोडोलीत २ लाख ६५ हजाराचा तंबाखू, गुटखा जप्त ; एकास अटक

Archana Banage

केंद्र सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावरच चुली अन् भाकरी

Archana Banage

रेमडीसिव्हीयरचा काळाबाजार तात्काळ थांबवावा : समरजितसिंह घाटगे

Archana Banage

क. बीड. रोजगार हमी योजनेतून सव्वा कोटींच्या कामांचा गणेशवाडीतून शुभारंभ

Archana Banage

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीकडून प्रा.आसगावकर यांचा अर्ज दाखल

Archana Banage