Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांत सक्रीय रूग्णसंख्या दुप्पट

रविवारी 34 सक्रीय रूग्ण, गुरूवारी 65 सक्रीय, रूग्ण 24 तासांत कोरोनाचे नवे रूग्ण 17, कोरोनामुक्त 4

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात रविवारी कोरोना सक्रीय रूग्णसंख्या 34 होती, ती गुरूवारी 65 झाली, चार दिवसांत सक्रीय रूग्णसंख्या दुप्पट झाली आहे. गेल्या 24 तासांत 17 नवे रूग्ण दिसून आले. तर 4 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 219 जणांची तपासणी केल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. आजपर्यत केरोनाने 1 हजार 712 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 844, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 368 तर अन्य 153 जणांचा समावेश आहे. सध्या 65 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 219 जणांची तपासणी केली. त्यातील 110 जणांची ऍटीजेन टेस्ट केली आहे. दरम्यान, रविवारी सक्रीय रूग्णसंख्या 34 होती, ती चार दिवसांत 65 वर पोहोचली आहे.

शेंडा पार्क येथील लॅबमधून गुरूवारी 784 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 768 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 84 रिपोर्ट आले. त्यापैकी 82 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 113 रिपोर्ट आले, त्यापैकी 102 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहर 9 व अन्य 5 असे 17 रूग्ण आहेत. दिवसभरात चौघांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 936 झाले. नव्या 17 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 713 झाली आहे. दिवसभरात सर्वच तालुक्यांत नव्या रूग्णांची नोंद निरंक राहिली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.

पॉझिटिव्ह रूग्ण 17, कोरोनामुक्त 4, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 713
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 936
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 65
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1712
गेल्या 24 तासांत 219 संशयितांची तपासणी

Related Stories

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी २६ सप्टेंबर नोंदणी करा

Archana Banage

लता मंगेशकर यांचे पन्हाळा, जोतिबा श्रद्धास्थान, कोडोलीत आर. आर. पाटलांच्या घरी भेट

Archana Banage

हातकणंगले परिसरात उनाड फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

Archana Banage

साताऱ्यातील उच्चशिक्षित महिलेकडून बनावट नोटांसह 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीतील कोविड रुग्णालयातील व्हेंटिलेटरला आग

Archana Banage

बावडय़ातील त्या वृद्धेचा दुसरा स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!