Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात 45 कोरोनामुक्त, नवे 24 रूग्ण

Advertisements

सक्रीय रूग्णसंख्या 305, कोरोना मृत्यू निरंक

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 24 नवे रूग्ण दिसून आले असून 45 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 305 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

जिल्ह्यात बुधवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. त्यामुळे बळींची संख्या 1 हजार 748 आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 853, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 388 तर अन्य 158 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 45 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 688 झाली आहे. बुधवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 2, करवीर 1, पन्हाळा 2, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहरात 12 तर अन्य 3 जणांचा समावेश आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून बुधवारी आलेल्या 495 अहवालापैकी 433 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 75 अहवाल आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 238 रिपोर्ट आले. त्यातील 215 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 741 आहेत. त्यापैकी 48 हजार 688 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात 305 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.

कोरोना रूग्ण 24 : एकूण : 50741
कोरोनामुक्त 45 : एकूण : 48688
कोरोना मृत्यू :0 एकूण मृत्यू : 1748
सक्रीय रूग्ण : 305

Related Stories

वारणा दूध संघामार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम 

Archana Banage

कोल्हापूर : उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

Archana Banage

सावरवाडी येथे विहीरीत पाय घसरून पडल्याने महीलेचा मृत्यू  

Abhijeet Khandekar

‘यंत्रमाग व्यवसायाला व्याज सवलत देण्याचे सहकार बँकांना आदेश द्यावे’

Archana Banage

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत कामगारांवर उपासमारीची वेळ

Archana Banage

जिह्यातील 4 लाख रेशन ग्राहकांचे होणार धान्य बंद

Archana Banage
error: Content is protected !!