Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ातील राज्य, प्रमुख मार्ग बंद पर्यायी मार्गाने वाहतुक सुरू

प्रतिनिधी / कोल्हापूर

शनिवारी पाऊस नसला तरी गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे, नदी नाले तुडुंब भरले आहेत. परिणामी रस्त्यावर तीन ते चार फुट पाणी आले आहे. येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा आहे. त्यामुळे जिल्हय़ातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली आहे.

करवीर तालुक्यातील शिंगणापूर रामा-194 तसेच चिखली ते राष्ट्रीय महामार्ग पाणी आल्याने वाहतूक बंद. चिखली गावाच्या कमानी जवळ पाण्या आल्याने व प्रयाग पुल ते वरणगे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. वरणगे, पाडळी, येवलुक व खुपिरे मार्गे वाहतूक सुरु. बाचणी बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद. कसबा बीड, घानवडे मार्गे वाहतूक सुरु. शिरोली गावाजवळ मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद. शिरोली दुमाला, घानवडे, हसूर दु. सोनाळी ते चाफोडी मार्गे वाहतूक सुरु. महे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. महे गावापर्यंतची वाहतूक बालिंगा पाडळी व कसबा बीड कुडित्रे फॅ. सांगरुळ मार्गे वाहतूक सुरु. कोगे बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद कुडित्रे करिता गगनबावडा मार्गे व कोगे करिता बालिंगा पाडळी मार्गे वाहतूक सुरु आहे. लहान पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद कोल्हापूर परिते मार्गे बालिंगा, पाडळी, महे वाहतूक सुरु. शेळकेवाडी गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.

चंदगड तालुक्यातील चंदगड पुलावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद. इब्राहिमपूर पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद कनुर गवसे, इब्राहिमपूर, आडकुर मार्गे वाहतूक सुरु. दाटे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आमरोली, सोनारवाडी मार्गे वाहूक सुरु. करंजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. मांडेदुर्ग मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद ढोलकरवाडी गौळवाडी मार्गे वाहतूक सुरु. तळगुळी सी. डी. वॅर्कवर पाणी आल्याने कुदनुर पुलावर पाणी आल्याने, ढोलकरवाडी सी. डी. वॅर्कवर पाणी आल्याने वाहतूक बंद. म्हळेवाडी गावाजवळ, निट्टुर मोरीवर पाणी आल्याने वाहतूक बंद कोवाडा ढोलकरवाडी गौळवाडी मार्गे वाहतूक सुरु. माणगाव के.टी. वीयरवर पाणी आल्याने वाहतूक बंद. पाटणे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद. कोवाड गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद. काणूर व गवसे गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद गडहिंग्लज, आजरा, नेसरी मार्गे वाहतूक सुरु. उंबरवाडी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद सुळे, महागाव मार्गे वाहतूक सुरु. निलजी बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद. दुंडगे, जरळी, मुंगळी, नुल मार्गे वाहतूक सुरु.जरळी बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद गडहिंग्लज, आजरा, नेसरी, महागाव मार्गे वाहतूक सुरु. हलकर्णी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद बसरगे, येणेचंवडी, नंदनवाड, हलकर्णी मार्गे वाहतूक सुरु.कानडेवाडी बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद नेसरी अडकूर मार्गे वाहतूक सुरु आहे.

भुदरगड तालुक्यातील हळदी गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद परिते, शेळेवाडी मार्गे वाहतूक सुरु. गगनबावडा तालुक्यातील मांडुकली ओढय़ावर पाणी आल्याने, कोदे फाटय़ाजवळ पाणी आल्याने, दानेवाडी जवळ पाणी आल्याने वाहतूक बंद असून, आंदुर बंधाऱयावर पाणी आल्याने वाहतूक बंद अनदुर, मणदुर, वेतवडे, बालेवाडी मार्गे वाहतूक सुरु. मनवाडा बंधाऱयावर पाणी आल्याने वाहतूक बंद असून, कोल्हापूर चिखली, पाडळी, येवलुज, बाजारभोगाव मार्गे वाहतूक सुरु आहे. हातकणंगले तालुक्यातील ऐतवडे पुलावर पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरु. रांगोळी ते इचलकरंजी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद जंगमवाडी, बोरगाव, इचलकरंजी मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. इचलकरंजी जुन्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद इचलरकंजी नवीन पुलावरुन वाहतूक सुरु. माणकापूर, इचलरकंजी दरम्यान पाणी असल्याने माणकापूर शिवनाकवाडी मार्गे वाहतूक सुरु. निलेवाडी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद वारणानगर चिकुर्डे मार्ग वाहतूक सुरु. शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद नंदणी जयसिंगपूर मार्गे वाहतूक सुरु आहे.

राधानगरी तालुक्यातील निढोरी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद यमगे, निपाणी मार्गे वाहतूक सुरु. शिंदेवाडी गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद निढोरी ते मुदाळ मार्गे वाहतूक सुरु. शिरगाव बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद तारळे, राशिवडे मार्गे वाहतूक सुरु आहे. कागल तालुक्यातील चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद कौलगे, हमीदवाडा, खडकेवाडा मार्गे चिखली वाहतूक सुरु. बस्तवडे बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद अनुर ते बानगे मार्गे वाहतूक सुरु. सर पिराजीराव तलावातील पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद हासुर बोळावी, ठाणेवाडी मार्गे देवगड, राधानगरी, मुरगुड मार्गे वाहतूक सुरु.

कुरकली पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद कोल्हापूर कुरुकली व हासुर करिता हळदी सडोली खालसा मार्गे वाहतूक सुरु आहे. चिखली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद कौलगे हमीदवाडा खडकेवाडा मार्गे वाहतूक सुरु आहे. आजरा तालुक्यातील साळगाव बंधायावर पाणी आल्याने वाहतूक बंद ओडीआर 139 सोहाळे, बाची मार्गे वाहतूक सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद मलकापूर यळवण मांजरे अनुस्कुरा मार्गे वाहतूक सुरु. गोठे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद मल्हार पेठे, सुळे, कोदवडे मार्गे वाहतूक सुरु. माजगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद कळे, पुनाळ, दिगवडे मार्गे वाहतूक सुरू. केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने रस्ता बंद. गायमुख वळण रस्त्यावरून मार्गे वाहतूक सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील डोणोली गावाजवळ बंधाऱयावर पाणी आल्याने वाहतूक बंद थेरगाव, सातर्डे सातवे शिंदेवाडी व थेरगाव सावर्डे, सातवे मार्गे वाहतूक सुरू. शिरगांव मठ ते सवतेमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद मलकापूर, सावे, बांबवडे, सुरुड मार्गे वाहतूक सुरू आहे.

Related Stories

कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन; प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई

Archana Banage

सेनेला आणखी एक धक्का; भावना गवळी समर्थक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात

datta jadhav

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कोरोनाची लस

Tousif Mujawar

प्रकृती खालावली असतानाही खा. बापट प्रचाराच्या रिंगणात

datta jadhav

कोल्हापूर : पेठ वडगाव पालिका उपनगराध्यक्षपदाचा शरद पाटील यांनी दिला राजीनामा

Archana Banage

‘सारथी’ला उर्वरीत 94 कोटी 25 लाख अनुदानाचे वितरण

Archana Banage
error: Content is protected !!