Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना रुग्णांत वाढ, आज 1 हजार 855 नवे पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात शुक्रवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 855 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 366 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 500 झाली आहे. कोरोना मृत्यू कमी झाले असले तरी नव्या रूग्णांत वाढ झाली आहे. परिणी सक्रीय रूग्णसंख्येतही वाढ झाली आहे.

जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 95 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 151, नगरपालिका क्षेत्रात 627, शहरात 822 तर अन्य 495 आहेत. मृतांमध्ये जिल्हय़ांतील 28 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 366 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 13 हजार 552 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 855 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 73, भुदरगड 38, चंदगड 41, गडहिंग्लज 59, गगनबावडा 12, हातकणंगले 238, कागल 58, करवीर 318, पन्हाळा 106, राधानगरी 69, शाहूवाडी 42, शिरोळ 76, नगरपालिका क्षेत्रात 154, कोल्हापुरात 546 तर अन्य 25 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 30 हजार 147 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 2 हजार 566अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 99 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 6 हजार 325 अहवाल आले. त्यातील 5 हजार 541 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 2 हजार 293 रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 689 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 11 हजार 184 स्वॅब रिपोर्ट आले.

परजिल्हय़ांतील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी कोरोनाने मृत्य़ू झालेल्यांत परजिल्हय़ातील सिंधुदुर्ग जिल्हय़ातील देवगड येथील एकमेव तर शहरातील राजेंद्रनगर, राजारामपुरी, मणेर मळा, फुलेवाडी, दौलतनगर, जवाहरनगर येथील सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 546 1309 1855
आजपर्यतचे बाधीत 36966 93181 1,30,147
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1366 1,13,552
दिवसभरातील मृत्यू 6 23 29
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 822 3173 4095
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 467 2099 2566
अँटीजेन 784 5541 6325
ट्रुनेट 604 1689 2293

Related Stories

हिरवडे गावचे अभिजीत ताम्हणकर यांची लेफ्टनंट पदी निवड

Archana Banage

जिल्हय़ात 5 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

मराठा महासंघाच्या ज्येष्ठ आघाडी जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण

Abhijeet Khandekar

अहो आश्चर्यम् ! सातार्डेत एका पायावर चालणारा कोंबडा

Abhijeet Khandekar

मुलाखतींच्या भूलथापांना बळी पडू नका

Archana Banage

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!