Tarun Bharat

कोल्हापूर जिल्हय़ात 1395 नवे कोरोना रुग्ण, 45 मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात मागील 24 तासात 1395 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 45 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 1529 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंतची जिल्हयातील सक्रीय रुग्णसंख्या 15 हजार 836 इतकी झाली आहे. सोमवारी जिल्हय़ात 1919 इतके रुग्ण आढळले होते. सोमवारच्या तुलनेत मंगळवारच्या रुग्णसंख्येत झालेली घट दिलासादायक आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन अलर्ट आहे. आरोग्य विभागाकडून संशयितांच्या तपासण्या सुरु आहेत. प्राफ्त झालेल्या अहवालानुसार मागील 24 तासात जिल्हय़ात 1395 इतके नवे रुग्ण आढळले. यामध्ये आजरा 53, भुदरगड 54, चंदगड 26, गडहिंग्लज 50, गगनबावडा 3, हातकणंगले 151, कागल 38, करवीर 218, पन्हाळा 50, राधानगरी 49, शाहूवाडी 37, शिरोळ तालुक्यात 45 इतके रुग्ण आढळले. कोल्हापूर शहरात 387 तर इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, गडहिंग्लज, कागल, शिरोळ, हुपरी, पेठवडगांव, मलकापूर, मुरगूड आदी नगरपालिका क्षेत्रात मिळून 161 इतके रुग्ण आढळले. तसेच परजिल्हा आणि परराज्यातून आलेले 73 संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मागील चोवीस तासात आरटीपीसीआर आणि सीबीएनएनटी टेस्टींग केलेल्या 3100 संशयितांचा अहवाल प्राफ्त झाला. यापैकी 2541 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 541 जणांचे अहवाल पॉझिटिव्हआले. अँटीजन टेस्टचे 3381 अहवाल प्राफ्त झाले. यामध्ये 2938 निगेटीव्ह तर 443 संशयित पॉझिटिव्ह आढळले. खासगी रुग्णालय, लॅबमधून प्राफ्त झालेल्या 1626 अहवालांपैकी 411 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

Related Stories

ग्रामपंचायत कर्मचाऱी कुटुंबियांच्या हस्ते ध्वजारोहण

Abhijeet Shinde

इचलकरंजी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दीपक पाटील यांच्याकडे

Abhijeet Shinde

गगनबावडा तालुक्यात पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांच्यावर जबरदस्ती कराल तर हिसका दाखवू: राजू शेट्टी

Abhijeet Shinde

कोडोलीतील शतकोत्तर नाताळची परंपरा यावर्षी साधेपणाने

Abhijeet Shinde

वनौषधी विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!