Tarun Bharat

कोल्हापूर : टेस्टींग वाढले, नव्या रूग्णांमध्ये वाढ

7 मृत्यू, 218 नवे रूग्ण, 364 कोरोनामुक्त,

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 7 जणांचा मृत्Îू झाला. त्यामध्ये शहरातील चौघांचा समावेश आहे. परजिल्ह्यातील बेळगाव येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात टेस्टींग वाढल्याने 218 नवे रूग्ण आढळले तर 364 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 688 झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील साने गुरूजी वसाहतीतील दोन, रिंगरोड आपटेनगर आणि नागाळा पार्क येथील 1, इचलकरंजी व पट्टणकोडोली येथील एक आणि बेळगाव येथील एकाचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 671 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 35, नगरपालिका क्षेत्रात 815, शहरात 1 हजार 230 तर अन्य 591 आहेत. दिवसभरात 364 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 95 हजार 286 झाली आहे. गेल्या 24 तासांत 218 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 1, भुदरगड 3, चंदगड 1, गडहिंग्लज 12, गगनबावडा 1, हातकणंगले 37, कागल 5, करवीर 40, पन्हाळा 12, राधानगरी 2, शाहूवाडी 16, शिरोळ 15, नगरपालिका क्षेत्रात 29, कोल्हापुरात 36, तर अन्य 8 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 2 हजार 645 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 30 आणि ग्रामीण भागात 404 जण होम कोरोंटाईन आहेत. ग्रामीण भागातील होम क्वांरटाईन रूग्ण पाचशेच्या खाली आले आहेत.

कोरोना रूग्ण : 218 एकूण : 2,02,645
कोरोनामुक्त : 364 एकूण : 1,95,286
कोरोना मृत्यू : 7 एकूण मृत्यू : 5671
सक्रीय रूग्ण : 1688

Related Stories

सांगलीतील वृद्ध महिलेची महिनाभराच्या ताटातूटीनंतरनंतर तिच्या कुटुंबीयांशी झाली भेट

Archana Banage

रांगोळीच्या लोकनियुक्त सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजुरीसाठी 30 रोजी मतदान

Archana Banage

कोल्हापूरने जोडले नांदेडशी ‘रक्ता’चे नाते

Archana Banage

राज्य विद्युत महावितरण कंपनीचा सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

कोल्हापूर : ग्रामपंचायतीवरील प्रशासक निवडीला वेग

Archana Banage

कोल्हापूर : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय

Archana Banage