Tarun Bharat

कोल्हापूर : टेस्ट वाढल्या, सलग दुसऱ्या दिवशी 1700 वर रूग्ण

कोरोना टेस्ट 29053 हजार, नवे रूग्ण 1785, जिल्ह्यात 31 बळी, 1153 कोरोनामुक्त, कोरोना मृत्यूंमध्ये घट, सक्रीय रूग्णसंख्येत वाढ

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात गुरूवारी दुसऱया दिवशी 29 हजारांवर टेस्ट झाल्या, त्यातून 1 हजार 785 नवे रूग्ण आढळून आले. नवे रूग्ण वाढल्याने परिणामी सक्रीय रूग्णसंख्या 9 हजार 653 झाली आहे. दिवसभरात यामध्ये 600 ने वाढ झाली आहे. कोरोनाने 31 जणांचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूंमध्ये घट झाली असली तरी पॉझिटिव्हीटी रेट अद्यापी स्थिर आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 31 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 552 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 432, नगरपालिका क्षेत्रात 679, शहरात 931 तर अन्य 510 आहेत. दिवसभरात 1 हजार 153 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 32 हजार 954 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 785 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 27, भुदरगड 36, चंदगड 14, गडहिंग्लज 72, गगनबावडा 4, हातकणंगले 224, कागल 80, करवीर 420, पन्हाळा 142, राधानगरी 44, शाहूवाडी 58, शिरोळ 84, नगरपालिका क्षेत्रात 139, कोल्हापुरात 383 तर अन्य 20 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 47 हजार 159 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 29 हजार 53 अहवाल आले. त्यापैकी 27 हजार 268 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 1 अहवाल आले. त्यातील 2 हजार 706 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 25 हजार 718 अहवाल आले. त्यातील 24 हजार 73 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 834 रिपोर्ट आले. त्यातील 489 निगेटिव्ह आहेत.

शहरात कोरोनाने 6 जणांचा मृत्यू, परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

रत्नागिरी आणि बेळगाव जिल्ह्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, मणेर मळा, विक्रमनगर, साळोखेनगर, नाळे कॉलनी येथील व्यक्तींचा समावेश आहे.

टेस्ट संख्या पॉझिटिव्ह रूग्ण
आरटीपीसीआर टेस्ट 3551 350
ऍटीजेन टेस्ट 29038 914
ट्रुनेट टेस्ट 1065 461
एकूण टेस्ट 33680 1725

कोरोना रूग्ण 1785 ः एकूण ः 1,47,159
कोरोनामुक्त 1153 ः एकूण ः 1,32,954
कोरोना मृत्यू 31 ः एकूण मृत्यू ः 4552
सक्रीय रूग्ण ः 9653

Related Stories

महाराष्ट्र केसरीचा मुहूर्त गुरुवारी ठरणार

Abhijeet Khandekar

वन्यप्राणी आणि माणूस नात्याचे नवे धोरण

Archana Banage

शिवसेना सहाव्या जागेसाठी आज दुसरा उमेदवार जाहीर करणार?

datta jadhav

शाहू साखरच्या नूतन संचालकांनी घेतली मंत्री मुश्रीफांची भेट

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा केंद्रावर उद्या नीट परीक्षा

Archana Banage

कोल्हापूर महिला संघाची राज्य रग्बीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक

Kalyani Amanagi