Tarun Bharat

कोल्हापूर : टोप येथील कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

टोप / वार्ताहर

टोप गावातील शनिवार (दि१८) रोजी घरी आजारी असणारी ४५ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना अस्वस्थवाटु लागल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे दाखल केले होते. उपचार सुरु असताना रविवारी मध्य रात्री मृत्यू झाला.

काही दिवसापुर्वी गावातील एका डॉक्टरकडे तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना अधिकच अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना उपचाराकरिता सीपीआरला दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा स्वॅब घेतला असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरु असतानाच काल रविवारी मध्यरात्री या महिलेचा मृत्यू झाला.

यामुळे गावात पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्याचे अनेकाचे स्वॅब तपासणी साठी घेतले असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. खबरदारी म्हणून घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे.

Related Stories

ऐन पावसाळ्यात पाचगावकरांचा पाण्यासाठी रास्ता रोको

Archana Banage

कोल्हापूर : “गणपती बाप्पा मोरया कोरोनाला हरवूया”च्या जयघोषात घरगुती बाप्पाचे आगमन

Archana Banage

नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केली भाजी मंडईची पाहणी

Patil_p

राज्यात पोलीस भरतीवरुन उद्रेक

Archana Banage

गंभीर : जिल्हय़ात 12 बाधितांच्या मृत्यूने खळबळ

Patil_p

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 122 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar