उचगांव / वार्ताहर
ट्रकने दिलेल्या धडकेमुळे गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पादचारी वृद्ध महिला जागीच ठार झाली. भागाबाई बसाप्पा लोहार (वय 75, रा. वाघुडे वसाहत, गडमुडशिंगी) असे तिचे नाव आहे. ट्रकचालक अर्जुन दिनकर वाळवेकर ( रा. गडमुडशिंगी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान ट्रक (एम एच 06 के 1044) गडमुडशिंगीमधील बिरदेव मंदिराकडे चालला होता. विठ्ठल मंदिराजवळ ट्रकने भागाबाई लोहार या पादचारी महिलेस धडक दिली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. ट्रकचालक अर्जुन वाळवेकर याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार विराज डांगे करत आहेत.


previous post
next post