Tarun Bharat

कोल्हापूर : डी.लिट पदवी देवून डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा सन्मान व्हावा

वार्ताहर / पुलाची शिरोली

भारत देशाची अस्मिता उंचावणाऱ्या कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना डी.लिट ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान व्हावा. अशी मागणी नूतन कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ज्येष्ठ उद्योजक रोटरी क्लब कोल्हापूर स्मार्ट सिटीचे असिस्टंट गव्हर्नर बाळासाहेब कडोलकर यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरू शिर्के यांना देण्यात आले.

ज्ञानेश्वर मुळे हे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. तसेच शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट ही त्यांची जन्मभूमी आहे. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी भारताच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवून एक प्रकारे देशाची अस्मिता उंचावली आहे. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेञातील संस्थांनी गौरव केला आहे. पण शिवाजी विद्यापीठाकडून अद्याप दखल घेतली गेली नाही. अशा या कोल्हापूरच्या थोर सुपुत्राचा सन्मान आपण डी.लिट ही शिवाजी विद्यापीठाची नामांकित पदवी देऊन करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याबाबतचे निवेदन याबाबत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कागल व हातकणंगले पंचतारांकित असोसिएशन, उद्यमनगर व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन तसेच सुमन साळी महिला व बाल विकास संस्था यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कुलगुरू शेळके यांना देण्यात आले. यावेळी सुमन साळी संस्थेचे अध्यक्षा प्रतिभा शिंगारे, रो. मानसिंग पानसकर, रो. वारणा वडगावकर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्मार्ट सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

पुणे मनपाच्या धर्तीवर रस्त्याचे डांबरीकरण करा

Archana Banage

कोल्हापूर : शासनाने पंचायत समितीच्या ऑफलाईन सभांना परवानगी द्यावी

Archana Banage

आजरा तहसिलदार कार्यालयातील लिपिक कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

शिक्षकांच्या सन्मानार्थ होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Archana Banage

जिल्ह्यात पाणीयोजनांसाठी रेट्रोफिटींग

Archana Banage

सांगरुळ येथे बिबट्या सदृस्य प्राण्याचे दर्शन

Archana Banage