Tarun Bharat

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कारखान्‍यातर्फे गगनबावडा तालुक्‍यासाठी रूग्‍णवाहिकेचे लोकार्पण

प्रतिनिधी / गगनबावडा

गगनबावडा तालुक्‍यातील सर्वसामान्‍य जनतेला आता शासकीय रूग्‍णवाहिकेवर अवलंबून न राहता येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍यावतीने रूग्‍णवाहिका उपलब्‍ध करून दिली आहे. या रूग्‍णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री व कारखान्‍याचे चेअरमन सतेज पाटील यांच्‍या उपस्थितीत जि. प. अध्‍यक्ष बजरंग पाटील यांच्‍या हस्‍ते श्रीफळ वाढवून संपन्‍न झाला.
   
गगनबावडा या दुर्गम व वाड्यावस्‍त्‍यावर विखुरलेला डोंगराळ तालुका .44 महसूली  गाांवे‍व 29 ग्रामपंचायती यांचा समावेश असलेल्या या  तालुक्यातील जनतेला  केवळ एकच  शासकीय रूग्‍णवाहिकेवर अवलंबून रहावे लागत होते.खोकुर्ले, गगनबावड  व धुंदवडे‍ खोऱ्यातील गावे वंचित होती. त्यामुळे रूग्‍णांना रूग्‍णवाहिकेअभावी उपचारासाठी तात्‍काळ हलविणे काही वेळा शक्‍य होत नव्‍हते. त्‍यामुळे काहींना आपला जीवदेखील गमवावा लागत होता. गगनबावडा तालुक्‍यातील जनतेची ही गरज लक्षात घेऊन कारखान्‍याचे चेअरमन व जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून तालुक्‍यातील जनतेची आरोग्‍यासाठी तातडीची रूग्‍णवाहिकेची सेवा उपलब्‍ध करून दिली आहे. या रूग्‍णवाहिकेमुळे आता गगनबावडा तालुक्‍यात शासकीय रूग्‍णवाहिकेच्‍या सेवेबरोबरच आणखी एक रूग्‍णवाहिका उपलब्‍ध झाली आहे. 

तालुक्‍यातील जनतेस अत्‍यावश्‍यक आरोग्‍य सेवेसाठी गरज भासल्‍यास रूग्‍णवाहिकेच्‍या 8275818181 या क्रमांकावरती संपर्क साधण्‍याचे आवाहन कारखाना प्रशासनातर्फे करण्‍यात आलेले आहे. या लोकार्पण सोहळयावेळी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष बजरंग पाटील, कारखान्‍याचे संचालक मानसिंग पाटील, बी. डी. कोटकर, उदय देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

‘ग्रामपंचायत’ साठी लागणार आणखी 739 ‘ईव्हीएम’

Kalyani Amanagi

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध राहून सामुदायिक अभिवादन

Archana Banage

जयसिंगपूर नगरपरिषदेला शववाहिका प्रदान

Archana Banage

तिरुपती विमानसेवा 22 फेब्रुवारीपासून

Archana Banage

कोल्हापूर : टीईटी परीक्षेचा गोंधळ, शेकडो विद्यार्थी मुकले परीक्षेला

Abhijeet Khandekar

कोल्हापूर-हैद्राबाद विमानसेवा बंद, प्रवाशांची गैरसोय होणार

Archana Banage