प्रतिनिधी / कुरुंदवाड
कुरुंदवाड शहरासह परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून त्या रुग्णांच्या वर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत ही सामाजिक बांधिलकी जपत येथील डॉक्टरांनी सुरू केलेल्या’ डॉक्टर कोविड ‘ सेंटरचा हा उपक्रम खरोखरच गरजेचा असल्याचे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील कुरुंदवाड नृसिंहवाडी मार्गावर असलेल्या जैन संस्कृतीक भवन येथे कुरुंदवाड आणि नृसिंहवाडी येथील डॉक्टरांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या डॉक्टर कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील सेंटरचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर मुकुंद घाटेपुजारी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात कोविड सेंटर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती ही गरज ओळखून कुरुंदवाड आणि नृसिंहवाडी तील दहा डॉक्टरांनी एकत्रित येत 30 बीडचे ऑक्सिजनयुक्त सुसज्ज कोविड सेंटर जैन सांस्कृतिक भवन येथे आजपासून सुरू करण्यात आले. नामदार यड्रावकर म्हणाले येथे अनुभवी डॉक्टर्स असल्याने रुग्णांच्या वर निश्चित चांगले उपचार होणार यात शंका नाही पण रुग्ण संख्या वाढू नये यासाठी सर्वांनी नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे तरच आपण ही रुग्णसंख्या आटोक्यात आणू शकतो.
यावेळी बोलताना डॉक्टर किरण पवार म्हणाले सर्वसामान्यांना येथे निश्चित चांगले उपचार होतील शासकीय दराप्रमाणे सर्व दर आकारले जातील त्याचबरोबर येथील रुग्णांना दररोज दोन वेळेचे जेवण नाष्टा चहा आणि एक फळ हे सेंटर मार्फत माफक दरात दिले जाणार आहे तसेच डॉक्टर मुकुंद घाटे पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमित माने, डॉक्टर किरण अनुजें, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर धनंजय पाटील, डॉक्टर उदय चौगुले, डॉक्टर संजय पाटील डॉक्टर आर एम पाटील डॉक्टर सारंग कोकाटे आणि आपण असे दहा डॉक्टरांचे पथक 24 तास कार्यरत राहणार आहे.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील नगरसेवक सुनील चव्हाण दिपक गायकवाड किरण सिंह जोंग, तसेच प्रफुल पाटील, जावेद बागवान, किरण आलासे, मुकुंद सावकार , संजय नांदगावे, गुरु खोचरे, जवाहर पाटील, कृष्णा गवंडी डॉक्टर पी एस पाखरे प्रतीक धनवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ऑक्सिजन निश्चित पुरवठा करतो
यावेळ बोलताना मंत्री यड्रावकर यांनी डॉक्टरांनी केलेल्या मागणीबाबत बोलताना म्हणाले या सेंटरला ऑक्सिजन कमी पडणार नाही याची खबरदारी मी घेतो असे सांगून जयसिंगपूर येथेही लवकरच 100 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असून तालुक्यासाठी 3 व्हेंटिलेटर ही उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


previous post
next post