Tarun Bharat

कोल्हापूर : तावडे हॉटेल महामार्ग वाहतूक सुरु

उचगाव / वार्ताहर

गेले पाच दिवस पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे बंद असलेला गांधीनगर, तनवानी कॉर्नर ते तावडे हॉटेल कोल्हापूर हा रस्ता दुपारी वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला. पुणे बेंगलोर महामार्ग चालू झाल्यानंतर तनवाणी कॉर्नर तावडे हॉटेल येथील महामार्ग उड्डाण पुलाखालील रस्त्यावर पाणी असल्याने ही वाहतूक उचगावमार्गे वळविण्यात आली होती. मात्र मंगळवारी उचगाव येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती.

तावडे हॉटेल महामार्ग उड्डाणपुलाखालील पाणी कमी झाल्याने गांधीनगर पोलिसांनी दुपारी तावडे हॉटेलमार्गे वाहतूक सुरु केली. वाहतूक सुरळीत चालू असल्याचे गांधीनगर पोलिसांनी सांगितले. गेले पाच दिवस हा रस्ता वाहतूकीसाठी बंद होता. आत्ता वाहतूक सुरळीत चालू झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निःस्वास सोडला.

Related Stories

कोल्हापूर : अतिवृष्टीने 55 हजार शेतकऱ्यांना फटका

Archana Banage

भुयेवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग आरक्षण जाहीर

Archana Banage

इचलकरंजी पालिकेतील बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

Archana Banage

‘साठी’ नंतर हायरिस्क म्हणूनच लस..!

Archana Banage

खासगी रुग्णालयांनी रुग्ण नाकारल्यास गुन्हा दाखल करु : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा इशारा

Archana Banage

माझ्यासाठी नको पक्षासाठी उमेदवारी द्या

Archana Banage