Tarun Bharat

कोल्हापूर : तीन हजाराची लाच स्विकारताना कॉन्स्टेबलसह होमगार्ड जेरबंद

प्रतिनिधी/कोल्हापूर

लाच स्विकारणार्‍या कॉन्स्टेबलसह होमगार्डला लाच लुचपत विभागाच्या पथकाने जेरबंद केले. तीन हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. करवीर पोलिस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.

पोलीस नाईक दादाहरी अभिमन्यू बांगर (रा.जुनी पोलीस लाईन नं9, पोलिस मुख्यालय, कसबा बावडा) आणि होमगार्ड प्रविण लहू पाटील (रा. भेंडे गल्ली, कुरूकली, ता.करवीर) अशी या कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली गाडी संबंधितांकडून परत मिळवून दिल्याबद्दल बक्षिस म्हणून पोलीस नाईक दादाहरी बागर आणि होमगार्ड प्रविण पाटील यांनी तक्रारदाराकडे 3 हजाराची लाच मागितली होती. ही लाच होमगार्ड पाटील याने स्विकारली. याचवेळी लाच लुचपतच्या पथकाने होमगार्ड पाटील यास रंगेहात अटक केली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलीस हेट कॉन्स्टेबल मनोज खोत, पोलीस नाईक शरद पोरे. नवनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल मयूद देसाई यांच्या पथकाने केली.

Related Stories

शाहरुखचा मुख्यमंत्री सरमा यांना रात्री 2 वाजता फोन…केली ‘ही’ मागणी

Abhijeet Khandekar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे सक्तमजुरी

Archana Banage

दोन संगीतचंद्रांना`प्रतिज्ञा’ची स्वरसुमनांजली !

Archana Banage

टोप येथील दोन हॉटेलवर पोलिसांची कारवाई

Archana Banage

प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्ड कार्यालय आवश्यकच

Archana Banage

कोल्हापूर : चंदूरातील रुग्ण संख्या 76 वर, गाव बनले हॉटस्पॉट

Archana Banage