Tarun Bharat

कोल्हापूर : थकीत घरफाळा, पाणीपट्टीसाठी पाणी कनेक्शन कट करण्याच्या मोहिमेला पोलीस संरक्षणात सुरुवात


कुंभोज / वार्ताहर:


कुंभोज तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून थकीत घरफाळा, पाणीपट्टी भरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. पण गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची थकीत असणारी जवळजवळ कोटीच्या घरात असणारी घरफाळा पाणीपट्टी जमा करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी चांगले प्रयत्न चालू केले होते.
परिणामी त्यासाठी ग्रामपंचायत कुंभोज यांनी पोलीस स्टेशन पोलीस उपविभागीय अधिकारी साहिल झरकर यांच्याकडून थकित पाणीपट्टी व घनफळा असणार्या नागरिकांचे पाणी कनेक्शन कट करण्यासाठी संरक्षण घेतले आहे.आज ग्रामसेवक सरपंच व पदाधिकारी यांच्या टीमने थकीत असणारे घरफाळा व पाणीपट्टी कनेक्शन धारकांचे पाणी कनेक्शन आज कट करण्यास सुरुवात केली, परिणामी नागरिकांनी घरफाळा पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत कुंभोज यांना सहकार्य करावे असे आव्हान ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले होते.


परिणामी ग्रामपंचायत कुंभोज यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्याकडे जवळ जवळ 60 लाख रुपये लाईट बिल थकीत असल्याने सदर विद्युत महामंडळाने ग्रामपंचायत पाणी पुरवठा कनेक्शन थकित लाईट बिल न भरल्यास लवकरात लवकर कट करण्याचे पत्र ग्रामपंचायत कुंभोज यांना दिले असून लवकरच थकित लाईट बिलमुळे ग्रामपंचायत विद्युत पुरवठा बंद होण्याची होण्याची शक्यता आहे.
यामुळे जे नागरिक कायमस्वरूपी घरफाळा पाणीपट्टी वेळेत भरतात अशा नागरिकांचा तोटा होण्याची शक्यता असून न भरलेल्या नागरिकांच्यामुळे कायमस्वरूपी घरफाळा पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना त्रास होणार आहे. नदीवरील पाणी कनेक्शन व लाईट कनेक्शन कट झाल्यास उन्हाळ्यात कुंभोज गावाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासणार आहे. नागरिकांनी सदर वेळआपल्यावर ती न येऊ देता आपला थकीत घरफाळा व पाणीपट्टी ग्रामपंचायत कार्यालयात भरावी असे आवाहन ग्रामविकास अधिकारी ए. एस. कटारे, सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दावीत घाडगे यांनी कुंभोज ग्रामस्थांना केली आहे. आज ग्रामपंचायतने चालू केलेल्या पाणी कनेक्शन कटच्या धडक मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पोलीस प्रोटेक्शनमध्ये पाणी कनेक्शन कट करत असताना अनेक नागरिकांनी जागेवर ती आपला घरफाळा पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य केले. त्यामुळे वसुलीस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

गांधीनगर ग्रामपंचायतीसमोर होणार जवाब दो आंदोलन

Archana Banage

वाळवा तालुक्यात एका दिवसात १८ जण पॉझिटिव्ह

Archana Banage

खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची मागणी

Archana Banage

तुळशी प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या देवस्थानच्या जमिनी प्रकल्पग्रस्तांच्या नावे करा

Archana Banage

‘अमृत जवान अभियान’ १ मेपासून

Archana Banage

नारायण राणेंच्या भेटीसाठी किरीट सोमय्या दिल्लीत

Archana Banage