Tarun Bharat

कोल्हापूर : नगरचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन यांचा स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविला अर्ज : महापालिका वर्तुळात खळबळ

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र सिताराम तथा आर. एस. महाजन यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवाकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. या अर्जाची प्रत त्यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पुणे विभाग नगर रचना विभागाचे सहसंचालक यांनाही पाठविली आहे. 15 फेब्रुवारी 2021 रोजी स्वेच्छा निवृत्ती अर्ज महाराज यांनी पाठविला असून वैयक्तिक कारणामुळे शासकीय सेवेत स्वेच्छा निवृत्ती स्वीकारत असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे. तीन महिन्यांच्या नोटीस कालावधीत आपल्या सेवामुक्त करण्यात यावे, असेही या अर्जात नमूद केले आहे.    

महाजन यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांचा दबाव, नगररचना विभागातील कामाचा ताण, कमी असलेला स्टाफ यामुळे महाजन यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. महाजन 23 सप्टेंबर 1996 पासून रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कार्यरत आहेत. गेल्या वर्षी 1 ऑक्टोबर 2020 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून रूजू झाले होते. एक साधा, सरळ, वादातीत अधिकारी म्हणून त्यांचा परिचय आहे.

कोरोनाच्या काळात नगररचना विभागात बांधकाम परवानगीच्या फाईल प्रलंबित पडल्या होत्या. त्याचबरोबर जानेवारीत राज्यात युनिफाईड बायलॉजची अंमलबजावणी सुरू झाली. या दरम्यान, प्रलंबित फाईलवरून नगररचना विभाग टिकेचा लक्ष्य बनला होता. बांधकाम व्यावसायिकातही परवानगी तत्काळ मिळत नसल्याने नाराजीचा सूर होता. अशा स्थिती नगररचना विभागातील अधिकाऱयांच्या बदल्याही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केल्या होत्या. सध्या नगररचना विभागाकडे उपनगररचनाकार पदी 1, कनिष्ठ अभियंतापदी 10 व इतर सर्व्हेअर असा स्टाफ आहे. 10 कनिष्ठ अभियंत्यांपैकी 2 दीर्घ रजेवर आहेत. उर्वरीत आठ पैकी तीन महिला आहेत. अपुऱया स्टाफवर नगरचना विभागाचे काम सध्या सुरू आहे. कमी स्टाफ, त्यात नवीन युनिफाईड बायलॉजनुसार बांधकाम परवानगी देणे, नियमित कामाबरोबर महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या कामाचा भार. यातून निर्माण होणारा ताण-तणाव, वरिष्ठ अधिकाऱयांचा दबाव यामुळे नगररचना विभागात सध्या खदखद वाढत आहे. महाजन यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या निर्णयामागे या गोष्टींचे कंगोरे असल्याचेही बोलले जाता आहे.

Related Stories

कोल्हापुरात भूकंपाचा सौम्य धक्का

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 31 बळी, 1519 नवे रूग्ण

Archana Banage

शिरोळ तालुक्यातील फळविक्रेते,भाजीविक्रेत्यांची आरोग्य तपासणी करणार – तहसीलदार

Archana Banage

कोल्हापूर : माथेफिरुकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक

Archana Banage

Kolhapur Rain Update : कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

Abhijeet Khandekar

रेशनवर मका ऐवजी 1 किलो जोंधळा द्या..

Archana Banage
error: Content is protected !!