Tarun Bharat

कोल्हापूर नाक्याने घेतला मोकळा श्वास

Advertisements

महामार्गावरील धोकादायक थांबा हटवला, ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल

प्रतिनिधी/ कराड

कराडचा कोल्हापूर नाका अपघात प्रवण क्षेत्र असूनही कोल्हापूर नाक्यावरील महामार्गावर खासगी आराम बसेसह वडाप वाहने थांबलेली असायची. त्यामुळे प्रवाशांची गर्दीही जीवघेण्या महामार्गावरच होत होती. यावर प्रकाशझोत टाकणारे वृत्त ‘तरूण भारत’ने प्रसिद्ध करताच पोलीस प्रशासनाला जाग आली. पोलिसांनी महामार्गावर थांबणारया खासगी वाहनांना हुसकावून लावत प्रवाशांनाही महामार्गावर धोकादायक पद्धतीने थांबण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कोल्हापूर नाक्याने मोकळा श्वास घेतला असून वाहतूक शाखेने या परिसरात सातत्याने गस्त घालण्याची गरज आहे. 

कोल्हापूर नाका हे कराडचे प्रवेशद्वार असले तरी या परिसरात जीवघेण्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. वारंवार अपघात होत असतानाही कोल्हापूर नाक्यावर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे खासगी आराम बस, खासगी वाहने, प्रवासी महामार्गावरच धोकादायक पद्धतीने थांबत होती. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. एका बाजूला ही कोंडी आणि दुसरीकडे कोल्हापूरकडून येणारी भरधाव वाहने या भयावह स्थितीत कधी कोणाला जीव गमवावा लागेल हे सांगता येत नाही. या परिस्थितीवर प्रकाश टाकणारे वृत्त तरूण भारतने गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध केले होते. 

पोलीस अधिक्षकांकडून दखल

कोल्हापूर नाक्यावरील वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोराडे यांनी गंभीर दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे पोलिसांनी कोल्हापूर नाक्यावरील खासगी वाहनांचा महामार्गावरील धोकादायक थांबा बंद करत वाहनधारकांना तशा सुचना देत कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात केली. महामार्गावर थांबणारे प्रवासी तातडीने हटवण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर नाक्याने आता मोकळा श्वास घेतला आहे. पोलिसांनी या परिसरात सातत्याने गस्त घालत लक्ष ठेवण्याची गरज आहे.   

खासगीचा वाहनांचाच आधार पण…   गेले महिनाभर एसटीचा संप असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र खासगी आराम बससह इतर वाहने थेट महामार्गावर पार्कींग करणे धोकादायक आहे. या वाहनधारकांना महामार्गावर न थांबवता नियोजन करून सेवारस्त्याकडेने जागा करून देणे आवश्यक आहे. कोल्हापूर नाका अपघातप्रवण क्षेत्र असून तेथे वळण व उतार

Related Stories

सातायात जुगार अड्डयावर छापा

Patil_p

अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार नाही सिद्धिविनायकाचे दर्शन

Rohan_P

विलासपूर, गोडोलीतही होणार लसीकरण

datta jadhav

कराडला 3 लाख नागरीकांचे लसिकरण

Amit Kulkarni

मलिकांच्या जामीन अर्जावर १९ जुलै रोजी सुनावणी

Abhijeet Shinde

सातारा : आरामबस चालकास मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!