Tarun Bharat

कोल्हापूर : निगवे खालसाचा जवान संग्राम पाटील शहीद..

Advertisements

शनिवारी रात्रीच्या पाकच्या भ्याड हल्यात संग्राम पाटील हुतात्मा…

चुये / प्रतिनिधी

जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानकडून  झालेल्या भ्याड हल्ल्यात निगवे खा.ता.करवीर येथील जवान संग्राम पाटील हा शहीद झाला आहे. शनिवारी रात्री राजौरी सीमेवर ही चकमक झाली. गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणात हुतात्मा झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

सैन्य दलात 16 मराठा बटालियनमध्ये तो सेबेत होता. शूर जवान संग्राम सीमेवर शहीद झाल्याने पाटील कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वीर जवान ऋशिकेश जोंधळे शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुर जिल्ह्यात सलग दुसरा जवान शहीद झाला आहे. शहीद जवान संग्राम पाटील याला हवालदार म्हणून बढती मिळाली होती. त्याच्या मागे  आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिनी असा परिवार आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांची नावे जाहीर

Abhijeet Shinde

बाजारभोगाव येथे दुकानदाराच्या हलगर्जीपणामूळे १३ टन रेशन पुरात वाया

Abhijeet Shinde

संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये सर्वांनी खबरदारी घेण्याचे आ.मुश्रीफ यांचे आवाहन

Abhijeet Khandekar

कॉलेज परिसर फुलला..

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम परिसरात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Abhijeet Shinde

सूर्याभोवतीच्या खळ्याचे कोल्हापुरात दर्शन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!