प्रतिनिधी / नवे पारगाव
वारणा नदीवरील निलेवाडी ता हातकणंगले येथील निलेवाडी – ऐतवडे खुर्द , कोडोली -चिकुर्डे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत . पावसाचा जोर असाच राहीला तर महापूर पुरस्तीस्थिती निर्माण होऊ शकते. वारणा धरणातून विसर्ग वाढला असल्यामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच एका आठवड्यात दुसऱ्यांदा वारणा नदी पात्रा बाहेर आल्यामुळे नदीकाठच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

