प्रतिनिधी / शाहुवाडी
निळे ता.शाहूवाडी येथील विवाहिता साधना अमित कुंभार वय ३१ हिचा मृतदेह गावातील यशवंत माने यांच्या शेताजवळील कडवी नदीच्या पात्रात आढळून आला. याबाबत महेश तानाजी कुंभार यांनी शाहूवाडी पोलिसांत वर्दी दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, साधना ही रविवारी सकाळी निळे येथील माहेरच्या घरातून निळे येथेच असलेल्या सासरच्या घरात जावून येतो असे सांगून घरातून निघून गेली. ती माहेरी व सासरी आली नसल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह यशवंत माने यांचे शेताजवळ कडवी नदीचे पात्रातील पाण्यात आढळून आला. तिचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. तिच्या पश्चात पती,दोन मुले , सासू , सासरे असा परिवार आहे.अधिक तपास पोहेकॉ इंद्रजित काशीद करित आहेत.