Tarun Bharat

कोल्हापूर : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टीचे आदेश

सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी

प्रतिनिधी / इचलकरंजी

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ व हातकणंगले तालुक्यात दि. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम यामधील कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या आदेशाचे दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम धारकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केले आहे. निवडणूक होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतीच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (MIDC) तसेच महानगरपालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत. अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी / विशेष सवलत द्यावी. शहरी भागात किंवा निवडणूका नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या, वाणिज्यिक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांविरूध्द आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

पोलिस आणि पत्रकार लोकशाहीतील जबाबदार घटक

Archana Banage

रॉबिनहूड आर्मी समाजसेवकांकडून परप्रांतीय कर्मचाऱ्यांना मदत

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात आठ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर

Archana Banage

कोल्हापूरातील बहिरेश्वरातील कारागीराला राष्ट्रिय शिल्प पुरस्कार

Abhijeet Khandekar

कागल तालुक्यातील व्हनाळीच्या सरपंचपदी छाया सुतार

Archana Banage

पाचगावात खा. महाडिक गट विरुद्ध आ. सतेज पाटील गटात चुरस

Abhijeet Khandekar