Tarun Bharat

कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव रुजू

प्रतिनिधी / कोल्हापूर

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची पुणे येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) या पदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर रायगड `एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी शंकरराव जाधव हे नवे निवासी उपजिल्हाधिकारी सामवारी रुजू झाले.

शंकरराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडून सुत्रे स्विकारली.

जाधव यांचे मूळगाव मेडशिंगे ता. सांगोला, जि. सोलापूर असून त्यांनी दापोली येथील कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. ऍग्रीचे शिक्षण घेतले आहे. हवेली (जि.पुणे) येथे तहसिलदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 2004 मध्ये कोल्हापूरचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून काम पाहीले आहे. एक वर्षभराच्या काळात त्यांनी दत्त आसुर्ले-पोर्ले, हमीदवाडा-कागल अशा महत्वाच्या साखर कारखान्यांच्या निवडणुकांसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Related Stories

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या प्रशासनाचा गडमुडशिंगीत सत्कार

Archana Banage

‘कोल्हापूर अर्बन’च्या अध्यक्षपदी शिरिष कणेरकर

Archana Banage

घटनादुरुस्ती हाच शेवटचा पर्याय

Archana Banage

Kolhapur : रांगोळीत मोटर सायकलींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार

Abhijeet Khandekar

सकल मराठातर्फे रविवारी कोल्हापुरात न्यायिक परिषद

Archana Banage

कोल्हापूर : दुग्ध व्यवसायामुळेच शेतक-यांची आर्थिक प्रगती : चंद्रकांत निऊंगरे

Archana Banage