प्रतिनिधी / शिरोळ
पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी शिरोळ येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीच्या पात्रात उतरून आंदोलन केले. प्रदूषण करणार्या घटकावर तातडीने कारवाई करावी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेट्टे यांनी दिला. प्रदूषणामुळे हजारों मासे मृत्युमुखी पडले. पाण्यास दुर्गंधी सुटली आहे.
यावेळी बोलताना सागर शंभू शेट्टी म्हणाले की, न्यायालयाने प्रदूषण मुक्तचा आदेश दिले आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन या विभागातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई न करता जास्तीत जास्त मलिदा कसा खायला मिळेल याकडे लक्ष दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या विभागाचे नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अद्यापि लक्ष दिले नाही त्यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी केली.
या आंदोलनामध्ये शिरोळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे, विश्वास बालीघाटे, बंडू पाटील, भिमगोड पाटील, गीता कांबळे, यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

