Tarun Bharat

कोल्हापूर : पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत संशयास्पद वीस लाखाची रक्कम जप्त

प्रतिनिधी / कुरुंदवाड

येथील शिवतीर्थ चौक परिसरात कुरुंदवाड पोलिस ठाण्यामार्फत पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी सुरू असताना कुरुंदवाड पोलिसांनी एका चारचाकी गाडीची तपासणी केली असता संशयास्पद वीस लाख रुपये रोख रक्कम मिळून आली.

ही रक्कम त्यांनी पुणे पदवीधर मतदान भरारी पथकाकडे फिरोज ऐतवडे व हेमंत जाधव यांच्या ताब्यात दिली असून यांनी सदरची रक्कम जप्त करून कोषागार कार्यालयाकडे जमा केली व वाहन जप्त करण्यात आले आहे.

येथील शिवतिर्थाजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सलीम सनदी रा. मिरज हा आपल्या मारुती सुझुकी स्विफ्ट क्रमांक (एम.एच 02बी.वाय860) मधून 20 लाख रुपये रक्कम घेऊन कर्नाटक राज्यातील एकसंबा तालुका चिकोडीकडे जात असताना वाहनाची तपासणी केली असता वीस लाख रुपये रोकड मिळून आली.

दरम्यान, पोलिसांनी पोलीस ठाण्यात सदरच्या शंभर व पाचशे भारतीय चलनातील नोटा अशा एकूण वीस लाख रुपये नोटांचे पोते मिळून आले पोलिसांनी सलीम सनदी व तीन सहकार्याची कसून चौकशी केली असता तो मसाला विक्रेता व्यापारी शेतकऱ्यांना ऍडवान्स देण्यासाठी जात असल्याचे सांगत आहेत सदरची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना मृत्यूमध्ये वाढ, 34 बळी, 1197 नवे रुग्ण

Archana Banage

Kolhapur: वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाला नेसरीत विरोध

Archana Banage

इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन को-ऑपरेशन प्रशासकीय मंडळावर डॉ. रूपा शहा यांची फेरनिवड

Archana Banage

महापुरातील शेतकर्‍यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये

Archana Banage

मतदार जनजागृतीसाठी शनिवारी परिसंवाद

Archana Banage

कोल्हापूर : कोव्हिड केअर सेंटरमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या त्या सहा जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage