पाटगांव/वार्ताहर
भुदरगड तालुक्यात मुर्ग नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने भात, नाचणी, भुईमुग पिके जोमान आली त्यानंतर गेली पंधरा दिवस तुरळक पावसाच्या सरी वगळता पावसाने पाठ फिरवल्याने माळराना सह शिवारातील पिके पावसाअभावी करपून जात आहेत. त्यामुळे हताश झालेल्या शेतकरी पावसाची वाट पाहात आहे.
भारतीय हवामान विभागाने महिन्यापासूनच पावसाचे भाकीत सांगत जोरदार पावसाच्या अंदाजाच्या बातम्या दिल्या. दोन-तीन दिवस अगोदर मान्सून आला जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत कमी अधिक प्रमाणात हा पाऊस बरसला. पावसावर आणि हवामान खात्याचा अंदाजाप्रमाणे पावसाला वेळेवर सुरुवात झाली. मात्र पावसाबरोबर निसर्ग चक्रीवादळ आले. या वादळाने सर्वांची दैना उडवली. त्यानंतर त्यातून कसेबसे सावरून शेतकऱ्यांनी पेरणी व भातपिकांची लावण केली. पीक तरारुन आले आणि पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे लागवडीला आलेली रोपे सुकू लागली आहेत. लावणीसाठी तयार भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे भाताचे पीक धोक्यात आले आहे.
माळरानावरील भात, नाचणा, भुईमुग पिकांनी पाण्याअभावी मान टाकली आहे. तर जमिनीला भेगा पडून पिकांवर करपा रोग, हुमणी रोग पडून पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी पिकांना लागवड देखील घालता येत नसल्याने पिकाची वाढ खुंटली असून याचा परिणाम उत्पादन वाढीवर होणार आहे. पाऊस नसल्याने ओढे .नाले, नदी पात्रातील पाणी पातळी कमी होत आहे. आठवडाभरात जर पाऊस पडला नाही. तर दुबार पेरणी करावी लागू शकते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.


previous post