Tarun Bharat

कोल्हापूर : पीक कर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात प्रथम

जिल्हाधिकार्‍यांकडून बँकांचे अभिनंदन
दुप्पट उद्दिष्ट घेवून मानांकन कायम ठेवण्याचे आवाहन

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ाकरिता पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट 2 हजार 480 कोटीचे असून 31 ऑगस्ट 2020 अखेर 1 हजार 892 कोटी इतकी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात कोल्हापूर प्रथम स्थानावर राहिला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँक, सर्व राष्ट्रियकृत बँक,  खासगी बँक आणि यंत्रणेचे अभिनंदन केले. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा स्वतःहून दुप्पट उद्दिष्ट घेऊन यापुढे सर्वांनी कामकाज करावे आणि जिल्हय़ाचा मानांकन नेहमीच प्रथम स्थानी ठेवावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केली.

जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक शुक्रवारी गुगलमिटच्या सहाय्याने घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले, प्रलंबित असणार्‍या कामकाजाबद्दल सर्वांनी नियोजन करून तसा आराखडा पाठवावा. पुढच्या सहा महिन्यात यावर काम व्हायला हवं. बीएलबीसीच्या बैठकीत आमदार, स्थानिक लोकप्रतिनीधी यांना निमंत्रीत करावे आणि बँकांनी विविध योजनांच्या कर्ज वाटपाची यादी बैठकीत सादर करावी.

ग्राहकांशी अस्थेने बोला

ग्राहकासाठी आपण सेवा देत आहोत. ही आस्था ठेवून ग्राहकांना चांगली वागणूक देवून सुसंवाद ठेवावा. याविषयी क्षेत्रीय स्तरावर प्रबोधन करण्यात यावे. राष्ट्रीय बँकांविषयी तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने यांनी आढावा दिला. यावेळी रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक मनोज मून, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सहभागी झाले होते.

विविध योजनेतून उघडण्यात आलेली खाती
योजना       बँक खाती
जनधन            10 लाख 78 हजार 33
रूपे कार्ड प्रदान      7 लाख 72 हजार 136
जीवनसुरक्षा विमा    4 लाख 74 हजार 700
जीवनज्योती विमा    1 लाख 84 हजार 308 खाती 
अटल विमा   58 हजार 347 
मुद्रा        7 हजार 842
मुद्रा योजना वाटप 113.129 कोटी

Related Stories

शिवराज्याभिषेक दिन आता शिवस्वराज्य दिन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Archana Banage

कोल्हापूरचा सुपूत्र डॉ.अजिक्य भंडारीने बजावले साहशी कोरोना योद्ध्याचे कर्तव्य

Archana Banage

शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने भव्य मोर्चा

Archana Banage

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकिस; नात्याला काळीमा फासणारी घटना

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्ह्यात चौघांचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage

तोडणी,वाहतूक खर्चाचा `एफआरपी’ला फटका

Archana Banage