Tarun Bharat

कोल्हापूर : पेठ वडगावात एक युवती कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी / पेठ वडगाव

गेल्या दोन दिवसापूर्वी पुण्यावरून आलेल्या येथील एका युवतीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाग्रस्त युवतीला हातकणंगले कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या आई-वडिलांसह संपर्कातील आलेल्या एका नातेवाईकाला येथील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

येथील आंबा रोडवरील एका कुटूंबातील युवती पुणे येथे नोकरीस आहे. गेल्या शनिवारी मध्यरात्री ही युवती आपल्या सख्या भावाला घेऊन येथे आली होती. दरम्यान, भाऊ परत पुण्याला गेला. सकाळी चहा नाष्टा करून तरुणीच्या आरोग्य तपासणीसाठी तिचे वडील व चुलत भाऊ मोटारी मधून अतिग्रे येथील कोव्हिड सेंटरवरती गेले होते. यावरती या तरुणीचा घशातील स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. रविवारी रात्री तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

यामुळे वडगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिका प्रशासनाने परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. प्रशासनाने कोरोनाग्रस्त युवतीच्या आई, वडील व एका नातेवाईकाला अलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, अंबप येथेही एक इसम कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

Related Stories

कोल्हापूर : वारणा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर, खोची – दुधगाव बंधारा पाण्याखाली

Archana Banage

कोल्हापूर : जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सर्वेक्षण सुरू

Archana Banage

कोल्हापूर : नवीन घरात राहण्याच्या कारणावरून महिलेचा खून, दोघांना अटक

Archana Banage

धास्ती महापुराची…तयारी स्थलांतराची

Abhijeet Khandekar

भारतीय जनता युवा मोर्चाच्या तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Archana Banage

महाराष्ट्राला 80 हजार रेमडेसिवीरची गरज आणि गुजरातमध्ये मोफत वाटप सुरू : संजय राऊत

Tousif Mujawar
error: Content is protected !!