Tarun Bharat

कोल्हापूर : पेठ वडगावात ५ कोरोना रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या १६६ वर

प्रतिनिधी / पेठ वडगाव

पेठ वडगाव शहरात आज पाच कोरोना रुग्णांची भर पडली. वडगाव शहरात यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये एका माजी उपनगराध्यक्षाचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

पेठ वडगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होवू लागली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका व पोलीस प्रशासन करत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज यामुळे व्यक्त होत आहे. श्वसनाचे त्रास असलेल्या रुग्णांना व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होण्यासाठी नातेवाईकांची धावपळ उडत आहे. भाजीपाला विक्रेते, सराफ व्यावसाईक, किराणा दुकानदार, बँक कर्मचारी, राजकीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. यामुळे शहराची कोरोना विस्फोटाकडे वाटचाल सुरु असल्याची भीती व्यक्त होत आहे. वडगाव शहर परिसरासाठी सुरु होणार असलेले कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु होण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा प्रशासनास सूचना देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

Related Stories

ट्रॅक्टरखाली सापडून मळगे खुर्द येथील युवकाचा मृत्यू

Archana Banage

कालकुंद्रीतील तरुणाची गळफासाने आत्महत्या

Abhijeet Khandekar

जोतिबा मंदीरात भाविकाचे पैसे चोरणारी महिला पोलीसांच्या ताब्यात

Archana Banage

कामात वेळकाढूपणा! कोल्हापूर महापालिकेने ३९ ठेकेदारांना दिला दणका

Rahul Gadkar

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

Archana Banage

लोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage