Tarun Bharat

कोल्हापूर : पेठ वडगाव शहरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य शोभायात्रेने स्वागत

सर्वधर्मियांचा सहभाग, विविध पारंपारिक वाद्ये, भगव्या पेहरावांनी लक्षवेधी मिरवणूक  

प्रतिनिधी / पेठ वडगाव

पेठ वडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा आगमन सोहळा पारंपारीक वाद्ये, ढोल वाद्याच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून भगव्या वातावरणात सर्वधर्मियांच्या सहभागाने संपन्न झाला. मिरवणुकीनंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापना केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट देवून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

पेठ वडगाव शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचे आश्वासन सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीने निवडणुकीत दिले होते. सत्तास्थापनेनंतर महाआघाडीने पुतळा परवानगीसाठी विविध शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून अश्वारूढ पुतळ्याचे आश्वासन पूर्ण केले. शिवरायांचा पुतळा आगमन सोहळा एक अविस्मरणीय ठरावा यासाठी भव्य स्वरुपात या आगमन सोहळा करण्याचा निर्णय घेवून या सोहळ्यात वडगाव शहरातील सर्वधर्मीयांच्या सहभागाने या पुतळ्याचे आगमन करण्यात आले. अत्यंत जल्लोषी आणि भगव्या वातावरणात झाले.

श्री महालक्ष्मी मंदिरापासून मिरवणुकीस सुरवात झाली. यावेळी श्री महालक्ष्मी मंदिरापासून मगरायाची वाडी, सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक, हनुमान रोड, घुमट गल्ली, बिरदेव चौक, विजयसिंह यादव चौक, एस.टी.बस स्थानक,पालिका चौक ते छत्रपती शिवाजी चौक असे सजविलेल्या कंटेनरमधुन हा पुतळा भव्य मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. दरम्यान पुतळ्याचे स्वागत करण्यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, जि.प.सदस्य अशोकराव माने यांनी उपस्थिती लावली. पुतळा स्थापनेवेळी छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ब्राँझ धातूचा, उंची बारा फूट शिवरायांचा पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा ब्राँझ धातूच्या साह्याने बनवलेला आहे. उंची बारा फुट तर चबुतर्याची उंची अकरा फुट राहणार आहे. मूर्तीचे वजन २ हजार ८०० किलो असून ही मूर्ती हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी येथील प्रसिद्ध मूर्तिकार संतोष चौगुले यांनी साकारली आहे. अत्यंत प्रभावशालीपणे साकारलेली बनवलेली ही शिवरायांची मूर्ती पाहण्यासाठी पेठ वडगाव शहरासह परिसरातील शिवप्रेमीनी उपस्थित लावली होती.    

Related Stories

उसाच्या ट्रॉलीला धडकून जखमी झालेल्या पेरीडच्या युवकाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

डॉ. दशरथ काळे आणि मिलिंद शिंदे महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परीनिरीक्षण सेन्सॉर बोर्डावर

Archana Banage

कोल्हापूर : पॉलिटेक्निकची पहिली यादी जाहीर

Archana Banage

इचलकरंजीत नियमांचे पालन न झाल्यास लॉकडाऊन अधिक तीव्र – जिल्हाधिकारी

Archana Banage

अणदूर पूर्ण क्षमतेने भरले

Archana Banage

मूर्तीकार गणेशमूर्ती तयार करण्यात व्यस्त

Archana Banage