शाहूवाडी / प्रतिनिधी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथील शाळी नदीवरील मलकापूर येळणे मार्गावरील कोल्हापूर बंधाऱ्यावर पोहोण्यासाठी उडी मारलेला मलकापूर येथील युवक निरंजन दिलीप कोठावळे (वय 22) हा युवक बेपत्ता झाला असून मलकापूर नगर परिषदेसह, पोलीस, स्थानिक युवक यांनी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली होती.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर येळणे मार्गावरील बंधाऱ्यावर सायंकाळी सातच्या दरम्यान पोहण्यासाठी निरंजन कोठावळे यांने उडी मारली उंचावरून उडी मारल्याने सदर युवक खोलवर पाण्यात पडला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध घेण्यात अडथळा निर्माण होत होता युवक बेपत्ता झाल्याने त्याची शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
घटनेची माहिती समजताच बंधाऱ्यावर नागरिकांनी गर्दी केली होती स्थानिक युवकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू होती घटनास्थळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी तात्काळ भेट देऊन घटनेची माहिती घेतली आपत्ती व्यवस्थापनाला तात्काळ संपर्क साधून सदर युवकाचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांशी संपर्क साधला आहे. रात्री उशीरा पर्यंत युवकाचा शोध घेण्यासाठी स्थानिक युवक, नागरिकांनी प्रयत्न केले.


previous post
next post