Tarun Bharat

कोल्हापूर : प्रायव्हेट लॅबनी एचआरसिटी टेस्टचे दरफलक लावा अन्यथा कारवाई

कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिह्यातील सर्व मान्यताप्राप्त प्रयोगशाळा, रुग्णालयांनी सार्वजनिक आरोग्य विभागाने एचआरसिटी तपासणीसाठी निश्चित केलेल्या दराचे फलक (मशीन प्रकारानुसार) दर्शनी भागात लावावेत, अशा सुचना आहेत. एचआरसिटी तपासणीसाठी निश्चित दरापेक्षा अधिक आकारणी केल्यास संबंधित लॅब, प्रयोगशाळा, स्वॅब सेंटर, तपासणी केंद्रावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिला आहे.

जिह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. रुग्ण परस्पर वैद्यकीय सल्ला न घेता प्रयोगशाळेमध्ये जाऊन एचआरसिटी अन्य तपासण्यांसाठी जात असल्याचे निदर्शनास आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असणारे, इतर रुग्णाकडून फक्त एचआरसिटी चाचणी केली जाते शासनाने त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅनची सुविधा असलेल्या प्रयोगशाळेमार्फत करण्यात येणाऱया तपासणीसाठी दर निश्चित केले आहेत. तसेच तपासणीबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार दर आकारावेत. जिह्यातील सर्व खासगी रुग्णालये, डॉक्टरांनी कोरोना सदृश्य संशयित, अन्य रूग्णांच्या एचआरसिटी, अन्य चाचण्याबरोबरच त्यांच्या आरटीपीसीआर, ऍटीजेन टेस्टची खात्री करावी, असे निर्देश आहेत.

एक्सरे लॅबमध्ये सद्यस्थितीत कोणत्याही डॉक्टरच्या प्रिक्रीप्शनशिवाय एचआरसिटी किंवा अन्य तपासणीची मागणी नागरिकांकडून होते. एक्सरेद्वारे तपासणीत जोखीम असल्याने नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिक्रीपशन शिवाय तपासणी करू नये. जिह्यातील सर्व मान्यताप्राप्त सिटीस्कॅन, एक्सरे लॅब, प्रयोगशाळांनी एचआरसिटी चाचणीनंतर अहवालावर कोणत्या मशिनद्वारे तपासणी केली, याची नोंद बंधनकारक केली आहे. एचआरसिटी तपासणीसाठी रेडिओलॉजिस्टने संपुर्ण तपासणीचा रिपोर्ट द्यावा, दिलेल्या दरापेक्षा अधिक आकारणी केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

एचआरसिटीसाठी निश्चित केलेले दर

मशिनचा प्रकार : 16 स्लाईसपेक्षा कमी सिटी : 2 हजार रूपये
मल्टी डिटेक्टर सिटी (एमडी सिटी) : 16 ते 64 स्लाईस : 2500 रूपये
मल्टी डिटेक्टर सिटी (एमडी सिटी) : 64 पेक्षा जास्त स्लाईस : 3 हजार

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात सहापर्यंत 458 पॉझिटिव्ह, 11 जणांचा कोरोनाने बळी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात वाढतोय ‘म्युकर मायकोसिस’चा संसर्ग

Archana Banage

कोल्हापूर : उपचाराविना चौघांचा मृत्यू

Archana Banage

असत्यमेव जयते.. जप्तीनंतर संजय राउतांचं ट्विट

Abhijeet Khandekar

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

Abhijeet Khandekar

दूधगंगा कालव्यात पडले गवे

Archana Banage