Tarun Bharat

कोल्हापूर : फिरस्त्याकडून फिरस्त्याचा खून

Advertisements

पद्मा चौकातील घटना, झोपण्याच्या जागेतून दोघांमध्ये वाद, संशयितास अटक
ग्रिलवर डोके आपटून 15 फुटावरुन ढकलले

प्रतिनिधी / कोल्हापूर

येथील पद्मा टॉकीज चौकामध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फिरस्त्यानेच फिरस्त्याचा खून केला. साडी सेंटर समोरील जागेमध्ये झोपण्याच्या कारणातून हा खून झाला. अमर (वय 25 ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित सुरज चंद्रकांत कांबळे (वय 31) याला अटक केली. याबाबतची फिर्याद साद महंमद शेख (वय 19 रा. यादवनगर) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित सुरज कांबळे व अमर हे दोघेही फिरस्ते आहेत. 10 वर्षापासून दोघेही एकमेकांना ओळखतात. सोमवारी मध्यरात्री अमर हा पद्मा चौक येथील सत्यनारायण तालीम इमारतीत एका साडी सेंटर दुकानाच्या पॅसेजमध्ये जेवण करीत होता. त्याच्या शेजारी बसलेल्या संशयिताने ही माझी झोपण्याची जागा आहे. जेवून झाल्यानंतर जागा निट स्वच्छ कर असे सांगितले. हि जागा तुझ्या बापाच्या मालकीची आहे का अशी विचारणा अमरने केली. यातून संशयीत सुरज कांबळे संतप्त झाला. तो अमरच्या अंगावर धावून गेला. यामुळे या दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. सुरजने अमरच्या शर्टाची कॉलर पकडून त्याचे डोके लोखंडी ग्रीलला जोरात आदळले. तसेच जखमी अवस्थेतच अमरला उंचीवरून तळमजल्यावर ढकलून दिले. यामध्ये अमरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळ अमर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडला होता. यानंतर काही वेळातच अमरचा जागेवरच मृत्यू झाला.

संशयिताला अटक

दोन फिरस्त्यामध्ये सुरु असलेल्या हाणामारीमध्ये साद शेख याने मध्यस्थीचा प्रयत्न केला. दोघांनी एकमेकांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. यातून या दोघांच्यात वाद झाला. दोघांच्या झटापटीत अमर पडल्यानंतर सादर शेख यांनी तात्काळ याची माहिती लक्ष्मीपुरी पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत सूरज कांबळेस अटक केली.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्य़ात कोरोनाचे 37 बळी,1184 रूग्ण, 1568 कोरोनामुक्त

Archana Banage

लसीकरणासाठी प्रशिक्षण सुरु

Archana Banage

बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवू – मंत्री मुश्रीफ

Archana Banage

निधी वितरण स्थगितीचे दोन दिवसाचे ‘कवित्व’

Kalyani Amanagi

पानिपत स्मृतिस्तंभ आंतरराष्ट्रीय स्मारक बनवूया

Archana Banage

…नाहीतर समांतर सभा घेणार- शौमिका महाडिकांचा इशारा

Archana Banage
error: Content is protected !!