Tarun Bharat

कोल्हापूर : बसर्गेत पोलिसाची आत्महत्या

वार्ताहर / हलकर्णी

गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथील पोलीस नाईक रामदास अशोक घस्ती (वय 34) याने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली. कांचनकुमार बाबुराव घस्ती (रा. बसर्गे) यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.

मयत रामदास घस्ती हा कोल्हापूर पोलिस दलात नोकरीस होता. सद्या तो चंदगड पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून काम करीत होता. बऱ्याच दिवसांपासून तो कामावर गैरहजर होता. त्यांचे त्यांच्या पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होते. पत्नी मुलग्यास घेवुन माहेरी राहते. त्यामुळे तो नैराश्येतुन वरचेवर कामावर गैरहजर राहत होता. कौटुंबिक नैराश्येपोटी तो व्यसनांच्या आहारीही गेला होता. या सर्व परिस्थितीमुळे त्याने राहत्या घरी लोखंडी हुकास नायलॉन दोरी बांधून गळफास घेवुन आत्महत्या केली. रामदास हा 2008 मध्ये पोलिस दलात भरती झाला होता. सुरूवातीला तो कोल्हापूरातील कंट्रोल रूमकडे कामाला होता. त्यानंतर आजरा, गारगोटी आणि चंदगड येथे कामावर होता. सहकाऱ्यात आणि मित्रपरिवारात तो मनमिळावु आणि प्रामाणिक म्हणून परिचीत होता.

Related Stories

लसीकरणासाठी प्रशिक्षण सुरु

Archana Banage

तेरा ऑक्टोबरपर्यंत ९५ टक्के लसीकरण पूर्ण करा

Archana Banage

Kolhapur : जि.प.कर्मचारी सोसायटीसाठी ‘दंगल’ सुरु

Abhijeet Khandekar

पर्यटन सप्ताहानिमित्त `रेन ऑफ रोडींग रेसर रॅली’

Archana Banage

व्यायामपटुंची पिढी घडवणारा बिभिषण….

Archana Banage

महापुरातील कामांची बिले मिळणार कधी ?

Archana Banage