Tarun Bharat

कोल्हापूर : बाप्पांची ‘दुवा’ आणि शाहूपुरी युवक मंडळाची ‘दवा’

संजीव खाडे / कोल्हापूर

शाहूपुरी व्यापारी पेठेतील तुळजा भवानी मंदिर परिसरातील शाहूपुरी युवक मंडळ सर्वपरिचित आहे. गेली चाळीस वर्षे या मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधानाचे कार्य केले आहे. यांत्रिक देखावे, विज्ञाननिष्ठ देखावे, सामाजिक प्रबोधनपर देखावे सादर करताना विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. दानशूर संस्था, व्यक्तींच्या सहकार्याने या मंडळाने आपत्तीच्या काळात अन्नधान्य वाटप, शालेय साहित्याचे वाटप, संगणक प्रदान, महापूरग्रस्तांच्या घराच्या पडलेल्या भिंती बांधून देणे, निवारा केंद्र उभारणी, औषध, कपडे वाटप आदी उपक्रम राबविले आहेत. 2019 च्या महापुराच्या काळात कुंभार समाजासह ढोल ताशा पथक व इतर आर्थिक हानी झालेले फेरीवाले, भाजीविक्रेते, शेतकरी, कष्टकरी आदी घटकांनाही त्यांचे संसार उभारण्यास मदत केली.

यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना तो डॉक्टर, नर्स, ब्रदर्स, सफाई कर्मचारी यांच्यासह कोरोनाच्या कार्यात जीवाची पर्वा न करता राबणार्‍या कोविड योद्धय़ांना समर्पित केला आहे. या कार्यात सर्वांत महत्वाचे कार्य म्हणचे कणेरीमठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि बेंगळूर येथील डॉ. के. जे. श्रीधरन यांनी तयार केलेल्या प्रतिकारशक्ती मात्राचे मोफत वाटप करण्याचा निर्णय शाहूपुरी युवक मंडळाने घेतला. त्यानुसार सकाळी रविवार 23 ते मंगळवार 25 ऑगस्ट या काळात सकाळी 10 ते 1 या वेळेत प्रतिकारशक्ती मात्राचे वाटप करण्यात येणार आहे. 15 वर्षांवरील आणि 15 वर्षांखालील अशा दोन वयोगटातील व्यक्तींसाठी एक लिटर आणि अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या घेऊन याव्यात. त्यांना प्रतिकारशक्ती मात्राचे थेंब मोफत दिले जाणार आहेत. भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रमेश पोवार, उपाध्यक्ष प्रकाश सौंदलगेकर, सचिव संजय पाटील यांनी केले आहे.

शाहूपुरी युवक मंडळ, तुळजा भवानी मंदिर परिसर, शाहूपुरी व्यापारी पेठ, यंदाच्या गणेशोत्सवाचे स्वरूप
1) दरवर्षीच्या पाच फुटी गणेशमूर्ती ऐवजी दोन फुटी गणेशमूर्ती.
2) वर्गणी न मागता साधेपणाने गणेशोत्सव, डामडोल नाही, त्या पैशातून गरजूंना मदत
3) मूर्तीकार, झांजपथक कारागिरांना आर्थिक मदत
4) कोरोनामुळे नुकसान झालेल्या हातावरचे पोट असणाऱयांना मदत
5) सीपीआरच्या कोरोना कक्षासाठी मदत
6) दरवर्षीप्रमाणे गरजूंना विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, शालेय साहित्य वितरण
7) शाहूपुरी परिसरात कोरोनाविषयक जागृती करणारे फलक लावणे.
8) सिद्धगिरी मठाच्या सहकार्याने प्रतिकारशक्ती मात्राचे वाटपू;;

Related Stories

अमेरिकास्थित भारतीय अभियंत्याची शिवाजी विद्यापीठ कोविड सेंटरला मदत

Archana Banage

झेंडू उत्पादकांना दसरा सणाला हातभार : फुलांना चांगला दर

Archana Banage

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण

Archana Banage

कोल्हापूर : महावितरणमधील 730 कंत्राटी कामगार बेरोजगार

Archana Banage

शाहूपुरी पोलिसांकडून दुचाकी चोरटा अटक, सव्वा लाखाच्या ५ दुचाकी जप्त

Archana Banage

पुलाची शिरोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार द्यावा

Archana Banage